सातारा - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज सातारा शहरासह जिल्ह्यातील सर्व दुकाने बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला. त्यानंतर ग्रामीण भागातील सर्व बाजारपेठा बंद केल्याचे पहायला मिळाले. मात्र, जिल्ह्यातील मुख्य शहरातील बाजारपेठेत सकाळी काही वेळ दुकाने सुरु होती. पोलिसांनी दुकाने बंद केल्यानंतरही रस्त्यावर गर्दी असल्याचे पहायला मिळत होते. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने आठवड्यातून फक्त सोमवार आणि गुरुवार या दोन दिवशी चालू ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून दिले आहेत.
#CORONA : साताऱ्यात ग्रामीण भागात बाजारपेठा बंद, शहरात मात्र सकाळी दुकाने सुरुच
जीवनावश्यक वस्तूंची दुकाने वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने आठवड्यातून फक्त सोमवार आणि गुरुवार या दोन दिवशी चालू ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून दिले आहेत.
हेही वाचा...सॅनिटायझरच्या वाढत्या किमतीला सरकारचा चाप, जाणून घ्या 'हा' नियम
आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अनेक आदेश पारित केले. यात सातारा जिल्ह्यातील शहरी भागातील म्हणजेच नगरपरिषद व नगरपंचायत क्षेत्र व त्यालगतचे 2 किलोमीटर परिसराच्या क्षेत्रातील जीवनावश्यक वस्तूंची दुकाने म्हणजेच किराणा, भाजीपाला-फळे, बेकरी, दूध, औषध दुकाने वगळता इतर सर्व प्रकारची दुकाने (कपडे, ज्वेलरी, हार्डवअेर अँड पेंटस्, इलेक्ट्रॉनिक्स, फर्निचर, शू मार्ट, स्टेशनरी, सौंदर्य प्रसाधने, बिल्डींग मटेरियल व इतर सर्व प्रकारची दुकाने) आठवड्यातून फक्त सोमवार आणि गुरुवार या दोनच दिवशी चालू राहतील. इतर दिवशी सदरची दुकाने पुढील आदेशापर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्यात यावीत, असे आदेश दिले आहेत.