सातारा- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. त्यानुसार सर्व जनतेला घरातच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील जनतेनेही या आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला आहे. अपवादात्मक अत्यावश्यक यंत्रणा वगळता सर्वांनीच घराबाहेर न पडता आपल्या घरातच राहून या कोरोना बाबतची सावधानता व खबरदारी घेतली असल्याचे पहिला मिळत आहे. तर घरोघरी यासंबंधी कार्यरत असलेल्या यंत्रणासाठी कृतज्ञताही व्यक्त करण्यात येत आहे. तर अनेक सामाजिक संस्था, लोकप्रतिनिधी, तसेच न्यायव्यवस्था देखील मदत करण्यासाठी पुढे सरसावलेल्या दिसत आहेत.
- कोरोनाबद्दल जनजागृती -
समाजात कोरोनाबाबत जनजागृती व्हावी, यासाठी नगराध्यक्ष सतीश जाधव यांच्या संकल्पनेतून दहिवडी शहरातील प्रमुख रस्त्यावर पेंटींग करून प्रभोधनात्मक स्लोगन व चित्रे रेखाटली जात आहेत. रस्त्यावरील स्लोगन आता लक्षवेधी ठरत आहेत. रस्त्यावर रेखाटलेले चित्रे पाहून आपसुकच नागरिकांचे पाय घराकडे वळू लागले आहेत. नगराध्यक्ष जाधव यांनी राबवलेल्या या अनोख्या संकल्पनेचे जनतेतून कौतुक होत आहे. करोनाविषयी प्रभोधनासाठी अश्या प्रकारे जिल्ह्यात पहिल्यांदा संकल्पना राबवणारे दहिवडी हे पहिले शहर ठरले आहे.
- गटविकास अधिकारी यांनी स्वतःच केली फवारणी -
माण पंचायत समितीमध्ये कोरोणा विषाणू प्रतिबंधक फवारणी स्वतः गटविकास अधिकारी गोरख शेलार यांनी केल्याचे पाहायला मिळाले. शासकीय कर्मचारी यांच्यावरचा वाढता ताण तसेच आरोग्य विभागाची जबाबदारी पार पाडत असताना आपल्या कार्यालयात स्वच्छता व फवारणी ते स्वतः करताना दिसले.
- न्यायव्यवस्था मदतीसाठी सरसावली -