सातारा- माणच्या पूर्व भागात आज सकाळी दमदार पाऊस झाला. या पावसाचा पिकांना फायदा होणार असून बळीराजा आनंदी झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात प्रथमच ओढ्या, नाल्यांमध्ये पाणी खळाळले आहे. तीस वर्षातून पहिल्यांदाच माणगंगा नदी म्हसवड भागामध्ये भरुन वाहताना पाहायला मिळाली.
पूर्व भागातील माणगंगा नदी तीन वर्षानंतर पहिल्यांदाच खळाळली
शुक्रवारी सकाळपासूनच वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत होता. त्यामुळे पावसाची अपेक्षा होती. पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराजा चिंतेत होता. आज सकाळपासूनच आभाळ काळ्याकुट्ट ढगांनी भरुन आले.
पूर्व भागातील माणगंगा नदी तीन वर्षानंतर पहिल्यांदाच खळाळली...
शुक्रवारी सकाळपासूनच वातावरणात कमालीचा उकाडा जाणवत होता. त्यामुळे पावसाची अपेक्षा होती. पावसाने हुलकावणी दिल्याने बळीराजा चिंतेत होता. आज सकाळपासूनच आभाळ काळ्याकुट्ट ढगांनी भरुन आले. माण, खटावच्या बहुतांशी भागाला व्यापून टाकत साधारण तासभर चांगला तर नंतर हलका पाऊस सुरू होता.
तासभर झालेल्या दमदार पावसामुळे म्हसवड, बनगरवाडी, शिरताव, विरकरवाडी, देवापूर या परिसरात अनेक ठिकाणी नालाबांध भरुन पावसाचे पाणी वाहिले. बंधारेही पासाने भरत आले आहेत.