सातारा :वाई तालुक्यातील मांढरदेवी यात्रेला (Mandhardevi Yatra starts from tomorrow) शुक्रवारपासून सुरूवात होत आहे. तीन दिवस चालणार्या या यात्रेला महाराष्ट्र आणि कर्नाटकातून 7 ते 8 लाख भाविक हजेरी लावतात. या यात्रेसाठी सातारा जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध (strict restrictions of district administration) लागू केले आहेत. 2005 मध्ये यात्रेतील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेनंतर मांढरदेव गडावरील यात्रा पूर्णपणे प्रशासकीय नियोजनानुसार साजरी होते.
यात्रेत या गोष्टींना आहे मनाई :यात्रेच्या काळात मांढरदेव मंदीर परिसरात पशुहत्या करण्यास (ban on animal slaughter) तसेच कोंबड्या, बकर्यांच्या वाहतुकीस मनाई असेल. मांढरदेव परिसरात वाद्ये आणता येणार नाहीत. मांढरदेव गडावरील झाडांवर खिळे ठोकणे, काळ्या बाहुल्या अडकवणे, लिंबू आणि बिब्बे ठोकणे, भानामती, करणी, नारळ फोडणे, तेल वाहण्यास आणि मद्य बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे.
चेंगराचेंगरीत 295 भाविकांचा झाला होता मृत्यू :भाविक पूर्वी यात्रेत (Mandhardevi Yatra) नारळ, तेल, लिंबू आणायचे. नारळ फोडल्याने तसेच तेल ओतण्याने मंदीर परिसर ओलसर व्हायचा. तसेच नारळ, लिंबवांचा सडा पडायचा. गडावरील पायर्या निसरड्या व्हायच्या. पायर्यांवरुन भाविक घसरायचे. याच कारणाने 2005 मध्ये मांढरदेव गडावर मोठी चेंगराचेंगरी झाली होती. त्या दुर्घटनेत 295 भाविकांचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून मांढरदेवीची यात्रा कडक निर्बंधात आणि प्रशासकीय नियोजनानुसार साजरी होत आहे.
न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली समितीचे गठण :चेंगराचेंगरीवेळी संतप्त भाविकांनी पोलिसांसह जिल्हाधिकार्यांनाही मारहाण केली होती. त्यानंतर यात्रोचे संपुर्ण नियोजन प्रशासनाने ताब्यात घेतले. जिल्हा न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत (Constitution of Committee) करण्यात आली. गडावरील सर्व सोई-सुविधा या समितीमार्फत उपलब्ध केल्या जातात. प्रशासकीय यंत्रणेने अंधश्रध्देला खतपाणी घालणार्या अनिष्ठ प्रथा, परंपरा हद्दपार केल्या आहेत.
प्रशासनाकडून तयारीचा आढावा :मांढरदेव यात्रा अनुषंगाने जिल्हा न्यायाधीश तथा देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्षा मंगला धोटे (Mangala Dhote), जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानेश्वर खिलारी, पोलीस अधीक्षक समीर शेख, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र जाधव, तहसीलदार रणजित भोसले, डीवायएसपी डॉ. शितल जानवे-खराडे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे यांच्यासह विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी काळुबाई मंदिर यात्रा तयारीचा आढावा घेतला. मांढरदेव परिसरात चोख पोलीस बंदोबस्त (police arrangement in Mandhardeo area) ठेवण्याची सूचना जिल्हा न्यायाधीश मंगला धोटे व जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी पोलीस प्रशासनाला दिल्या.