सातारा - आपसात पटत नसल्याने विभक्त राहणार्या पत्नीचे अश्लिल फोटो पतीने व्हायरल केल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, पत्नीला बदनामी करण्याची धमकी देत आरोपी मुलाचा ताबा मागत होता. पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून तिच्या पती विरोधात कराड ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
पतीने विभक्त राहणार्या पत्नीचे अश्लिल फोटो केले व्हायरल; बदनामीची धमकी देत मुलाचा मागितला ताबा
हे दाम्पत्य 2015मध्ये विभक्त झाले होते. त्यानंतर मुलाला भेटण्यासाठी आरोपी पत्नीकडे येत होता. त्यावेळी आरोपीने आपल्या पत्नीचे अश्लील फोटो काढले. त्यातील काही फोटो त्याने नातेवाईकांच्या मोबाईलवर व्हायरल केले. "मुलाचा ताबा मला दे, अन्यथा आपल्या दोघांचे अश्लिल फोटो व्हायरल करून तुझी बदनामी करीन" अशी धमकीही त्याने दिली.
हेही वाचा - धक्कादायक.. नाशिकमध्ये भरयात्रेत चार वर्षाच्या चिमुरडीवर बलात्कार
हे दाम्पत्य 2015मध्ये विभक्त झाले होते. त्यानंतर मुलाला भेटण्यासाठी आरोपी पत्नीकडे येत होता. त्यावेळी आरोपीने आपल्या पत्नीचे अश्लील फोटो काढले. त्यातील काही फोटो त्याने नातेवाईकांच्या मोबाईलवर व्हायरल केले. "मुलाचा ताबा मला दे, अन्यथा आपल्या दोघांचे अश्लिल फोटो व्हायरल करून तुझी बदनामी करीन" अशी धमकीही त्याने दिली. पतीकडून वारंवार होणार्या त्रासाला कंटाळून अखेर पत्नीने पती विरोधात कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली. याप्रकरणी कराड ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.