कराड (सातारा)- बहिणीला मारहाण करतो, म्हणून दाजीला गुन्ह्यात अडकविण्यासाठी प्रेयसीची हत्या करणार्या मेव्हुण्याला पोलिसांनी बेड्या ( Man Arrested Who Killed His Girlfriend ) ठोकल्या. कराड तालुक्यातील कार्वे-कोरेगाव येथे मृतावस्थेत आढळलेल्या तरूणीच्या खून प्रकरणाचा कराड ग्रामीण आणि सातारा स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी ( Satara Police Crime Branch ) शिताफीने छडा लावला. शरद हणमंत ताटे (वय 33, रा. येरवळे, ता. कराड), असे संशयीताचे नाव आहे तर वनिता आत्माराम साळुंखे (वय 30 वर्षे, रा. महिंद, ता. पाटण), असे हत्या झालेल्या तरूणीचे नाव आहे.
काय आहे प्रकरण..?
कराडपासून पाच किलोमीटर अंतरावर कार्वे-कोरेगाव हद्दीत उसाच्या शेताजवळ मंगळवारी (दि. 4 जानेवारी) सकाळी 30 वर्षीय युवतीचा मृतदेह आढळून आला. त्या युवतीची ओळख पटत नव्हती. मृतदेहाजवळच्या पिशवीत एकाच्या आधारकार्डची झेरॉक्स आणि चिठ्ठी होती. आधारकार्डवर नाव असणार्या इसमाकडे चौकशी केली. परंतु, ठोस माहिती मिळत नव्हती. नंतर पोलिसांनी त्याच्या मेव्हुण्याला ताब्यात घेऊन खाक्या दाखविताच त्याने खुनाची कबुली दिली. तसेच बहिणीला त्रास देतो, म्हणून दाजीला गुन्ह्यात अडकविण्यासाठी प्रेयसीचा खून करून चिठ्ठी आणि आधारकार्डची झेरॉक्स तिच्याजवळ ठेवल्याचे संशयिताने पोलिसांना सांगितले.
तरुणीची ओळख पटण्याआधी लावला छडा