महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

टोल वाचवण्यासाठी बनावट ओळखपत्र; एकाला अटक - गाडी जप्त

टोल वाचवण्यासाठी बनावट ओळखपत्राचा वापर करणाऱ्या रायगडमधील एका व्यक्तीला साताऱ्यात अटक करण्यात आली आहे. तसेच त्या व्यक्तीची गाडी देखील जप्त करण्यात आली आहे.

Man arrested using fake ID to save toll also
टोल वाचवण्यासाठी बनावट ओळखपत्र वापरणाऱ्या एका व्यक्तीला अटक

By

Published : Jan 30, 2020, 11:04 PM IST

सातारा - टोल वाचवण्यासाठी टोल कंपनीच्या बनावट सही-शिक्क्याचा वापर करून बनावट ओळखपत्र वापरणाऱ्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली. टोल चुकविण्याचा प्रयत्न करणार्‍या रायगड जिल्ह्यातील व्यक्तीला पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर तासवडे (ता. कराड) टोलनाक्यावर तळबीड पोलिसांनी अटक केली. बुधवारी (दि. 29) दुपारी ही घटना घडली. याप्रकरणी स्वप्नील बसवेश्वर चौगुले (26, रा. गोरेगाव, ता. माणगाव, जि. रायगड) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच त्याच्या जवळील गाडीही पोलिसांनी जप्त केली आहे.

हेही वाचा... 'सीएए'च्या समर्थनार्थ हिंदुराष्ट्र सेनेचे आंदोलन, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास एक कार (क्र. एम. एच 12 एस. एफ. 365) तासवडे टोलनाक्यावर आली. कार चालकाने टोल वसुली कर्मचार्‍यांना सहकार ग्लोबल लिमिटेड कंपनीच्या नावाचे बनावट सही-शिक्क्याचे ओळखपत्र दाखविले. ते ओळखपत्र बनावट असल्याचे टोल वसुली कर्मचार्‍यांच्या निदर्शनास आले. टोलनाक्यावरील कर्मचार्‍यांनी हा प्रकार टोल व्यवस्थापक रमेश शर्मा यांच्या निदर्शनास आणून दिला. त्यामुळे टोल व्यवस्थापनाच्यावतीने तळबीड पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. तक्रारीरून कार चालक स्वप्निल चौगुले याच्याविरोधात टोल कंपनीच्या नावाचे बनावट सही-शिक्क्याचे ओळखपत्र तयार केल्याचा आणि त्याचा वापर केल्याचा गुन्हा दाखल केला. तसेच संशयिताकडील कारही पोलिसांनी ताब्यात घेतली आहे. तळबीड पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक जयश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार सुरेश पिसाळ हे या घटनेचा तपास करत आहेत.

हेही वाचा... पनवेल-ठाणे मार्गावरून धावली पहिली एसी लोकल, रेल्वे राज्यमंत्री अंगडी यांच्या हस्ते उद्घाटन

ABOUT THE AUTHOR

...view details