महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mahavikas Aghadi Demands: बृजभूषणला अटक करा, नाहीतर खुर्ची खाली करा; मविआच्या मोर्चात केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी - Mahavikas Aghadi Demands

महिला कुस्तीगीरांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने सोमवारी पाटण तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. कुस्तीगीरांचे आंदोलन चिरडणाऱ्या केंद्र सरकारचा निषेध करून बृजभूषणला अटक करा, नाहीतर खुर्ची खाली करा, अशी घोषणाबाजी करण्यात आली.

Satara News
पाटण तहसील कार्यालयावर मोर्चा

By

Published : Jun 5, 2023, 10:08 PM IST

महाविकास आघाडीने सोमवारी पाटण तहसील कार्यालयावर मोर्चा काढला

सातारा:बृजभूषण शरण सिंह विरोधात सात कुस्तीगिरांनी केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपानंतर भारतात वादळ उठले आहे. महिला कुस्तीगीरांवरील अत्याचाराच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने सोमवारी पाटण तहसील कार्यालयावर मोर्चा काढला. खासदार बृजभूषण सिंह यांना अटक करण्याची मागणी आंदोलकांनी केली. तसेच महिला कुस्तीगीरांचे आंदोलन चिरडणाऱ्या केंद्र सरकारचाही यावेळी निषेध करण्यात आला. बृजभूषणला अटक करा, नाहीतर खुर्ची खाली करा, अशी घोषणाबाजी करण्यात आली.



युवतींसह खेळाडूंचा आंदोलनात सहभाग: खासदार बृजभूषण सिंह यांच्या अटकेच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या महिला कुस्तीगीरांचे आंदोलन अमानुषपणे चिरडणाऱ्या मोदी सरकारचा महाविकास आघाडीच्यावतीने पाटणमधील मोर्चात निषेध करण्यात आला. भाजपच्या अत्याचारी खासदाराला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा देण्याची मागणीही आंदोलकांनी केली. आंदोलनात महिला, युवतींसह खेळाडूंचा मोठा सहभाग होता.



केंद्र सरकारची हुकुमशाही: दिल्लीत गेल्या ३६ दिवस महिला कुस्तीपटूंचे आंदोलन सुरू होते. नवीन संसद भवनाचा उदघाटन सोहळा थाटामाटात सुरू असतानाच, दिल्ली पोलिसांनी अमानुषपणे महिला कुस्तीगीरांना फरफटत नेले. देशाला पदके जिंकून देणाऱ्या महिला खेळाडूंवर अमानुष कारवाई आणि त्यांचे लैंगिक शोषण करणाऱ्याला संरक्षण द्यायचे, ही केंद्र सरकारची हुकुमशाही असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.


रस्त्यावर उतरून विरोध करणार: येत्या काळात रस्त्यावर उतरून विरोध प्रदर्शन करून भाजप सरकारचा महिला विरोधी चेहरा जनतेसमोर उघड करू, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. खासदार बृजभूषण सिंह यांना त्वरीत अटक करावी, अशा मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आले. यावेळी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांचे पदाधिकारी, महिला, तरूणी, खेळाडू उपस्थित होते.

जयंत पाटील यांनी केली मागणी:या आधीही या प्रकरणात राष्ट्रवादीचे प्रदेशाअध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी ब्रजभूषणवर कारवाईची मागणी केली होती. बृजभूषणविरोधात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. यातील एक गुन्हा पोक्सो कायद्यांतर्गत नोंदवण्यात आला आहे. संसद भवनाच्या उदघाटनवेळी आंदोलन कर्त्यांनी पोलिसांनी आंदोलन ठिकाणहुन हटविले होते. यावेळी झटापटीत बृजभूषण विरोधात आंदोलन करणारे जखमी झाले होते. पोलिसांनी आंदोलन चिरडून टाकण्याचा प्रयत्न केला, पोलिसांना सरकारने आदेश दिला म्हणून हे आंदोलन चिरडले गेले, असा आरोप विरोधी पक्षाचे नेते यांनी केला होता. जयंत पाटील यांनी देखील पोलिसांनी केलेल्या कारवाईचा विरोध करत, बृजभूषणवर कारवाईची मागणी केली होती.

हेही वाचा -

  1. Jayant Patil Demand बृजभूषणवर कारवाई झाली पाहिजे जयंत पाटलांची मागणी
  2. Fresh Ultimatum To Centre ब्रिजभूषण सिंह यांना 9 जूनपर्यंत अटक करा अन्यथा शेतकरी नेते टिकैत यांचे अल्टीमेटम
  3. Wrestlers in FIR ब्रिजभूषणच्या कारनाम्याची लक्तरे वेशीवर चुकीच्या पद्धतीने स्पर्ष लैंगिक सुखाची मागणी एफआयआरमध्ये माहिती

ABOUT THE AUTHOR

...view details