सातारा - महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत राज्यातील लाभार्थी शेतकरी कर्जमुक्त होत आहे. केवळ ४८ तासात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच अन्य बँकांमध्ये असणाऱ्या कर्ज खात्यामधील दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम वजा झाल्याने शेतकऱ्याच्या डोक्यावरचा भार कमी होत आहे. बँकेतील कर्मचाऱ्यांनाही अधिक कागदपत्रे तपासण्याचा ताण राहिला नसल्याने कर्जमुक्ती योजना शेतकऱ्यांसोबत बँक कर्मचाऱ्यांसाठी देखील आनंददायी ठरत आहे.
'कर्जमुक्ती योजना' शेतकऱ्यांसोबत बँक कर्मचाऱ्यांसाठीही आनंददायी ! - Satara District Debt Waiver
केवळ ४८ तासात जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक तसेच अन्य बँकांमध्ये असणाऱ्या कर्ज खात्यामधील दोन लाख रुपयांपर्यंतची रक्कम वजा झाल्याने शेतकऱ्याच्या डोक्यावरचा भार कमी होत आहे. बँकेतील कर्मचाऱ्यांनाही अधिक कागदपत्रे तपासण्याचा ताण राहिला नसल्याने कर्जमुक्ती योजना शेतकऱ्यांसोबत बँक कर्मचाऱ्यांसाठी देखील आनंदीदायी ठरत आहे.
!['कर्जमुक्ती योजना' शेतकऱ्यांसोबत बँक कर्मचाऱ्यांसाठीही आनंददायी ! karjmukti](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-6364801-thumbnail-3x2-aa.jpg)
हेही वाचा...एक एप्रिलपासून पाच दिवसांचा आठवडा रद्द!
सातारा जिल्ह्यात ४६ हजार ४९६ शेतकऱ्यांच्या थकीत कर्ज खात्यावर २८९ कोटी २९ लाख एवढी कर्ज रक्कम बँकेत जमा झाली आहे. महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत ६३ हजार ९४३ शेतकरी खातेदारांची यादी संकेतस्थळावर आपलोड करण्यात आली आहे. त्यापैकी ५२ हजार ३२३ खातेदारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडील ३८ हजार ९२६ व अन्य बँकांकडील २५ हजार १७ असे एकूण ६३ हजार ९४३ शेतकऱ्यांची यादी संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.