सातारा -महाराष्ट्रातील आजच्या राजकिय परिस्थितीबाबत ( Political Crisis In Maharashtra ) आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कारण गेल्या दोन वर्षांपासून ही खदखद सुरू होती, अशी प्रतिक्रिया खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली आहे. सत्तेसाठी एकत्र येणारे भिन्न विचारांचे लोक फार काळ एकत्र राहू शकत नाहीत, असा उपरोधिक टोला खासदार उदयनराजे भोसले यांनी मारला आहे. महाराष्ट्रातील आजच्या राजकिय परिस्थितीबाबत आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. कारण गेल्या दोन वर्षांपासून ही खदखद सुरू होती, असेही त्यांनी म्हटले आहे.
भिन्न विचारांच्या लोकांना एकत्र ठेवणे ही तारेवरची कसरत -केवळ सत्तेसाठी एकत्र आलेल्या भिन्न विचारांच्या लोकांना एकत्र ठेवणे ही तारेवरची कसरत असते. परंतु,, असे लोक फार काळ एकत्र राहात नाहीत. सध्याची परिस्थिती हे त्याचे उदाहरण आहे, अशा शब्दांत खासदार उदयनराजेंनी राज्यातील सद्यस्थितीवर आपले मत व्यक्त केले.