महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Wrestling Competition : पैलवान संजय पाटील यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र केसरी विजेत्यास १ लाखाचे बक्षिस - महाराष्ट्र केसरी

महाराष्ट्र केसरी ( Maharashtra Kesari ) दिवंगत संजय पाटील यांच्या स्मरणार्थ (memory of wrestler Sanjay Patil) सातार्‍यातील स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताब जिंकणार्‍या मल्लास 1 लाख रूपयांचे बक्षिस (Maharashtra Kesari winner gets Rs 1 lakh prize) जाहीर करण्यात आले आहे. दिवंगत संजय पाटील यांचे बंधू पै. धनाजी पाटील यांनी ही घोषणा केली आहे.

The late Sanjay Patil
दिवंगत पै. संजय पाटील

By

Published : Apr 9, 2022, 10:02 AM IST

कराड (सातारा): कराड तालुक्यातील आटके गावचे सुपूत्र, महाराष्ट्र केसरी दिवंगत संजय पाटील यांच्या स्मरणार्थ सातार्‍यातील स्पर्धेत महाराष्ट्र केसरी किताब जिंकणार्‍या मल्लास 1 लाख रूपयांचे बक्षिस जाहीर करण्यात आले आहे. दिवंगत संजय पाटील यांचे बंधू पै. धनाजी पाटील यांनी ही घोषणा केली आहे. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद, सातारा जिल्हा तालीम संघ आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त विद्यमाने सातार्‍यात महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धा सुरू आहे.

1994 साली अकोला येथे झालेल्या स्पर्धेत आटके गावचे दिवंगत संजय पाटील यांनी महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावला होता. यावर्षीची स्पर्धा सातार्‍यात होत आहे. यानिमित्ताने महाराष्ट्र केसरी दिवंगत संजय पाटील यांच्या लाल मातीच्या ऋणातून उतराई होण्यासाठी महाराष्ट्र केसरी किताब जिंकणार्‍या मल्लास 1 लाख रूपयांचे बक्षिस देणार आहेत. नवोदीत मल्लांना प्रोत्साहन मिळावे, या हेतून विजेत्या मल्लास बक्षिस देणार असल्याचे पै. धनाजी पाटील यांनी जाहीर केले. सातार्‍यातील स्पर्धा शेवटच्या टप्प्यात आली असताना वादळी पावसामुळे आदल्या दिवशीच्या लढती रद्द कराव्या लागल्या आहेत.

हेही वाचा : Video : कराड तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा; झाडे, वीजेचे खांब कोलमडून पडले

ABOUT THE AUTHOR

...view details