महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Kho Kho Tournament : महाराष्ट्राच्या मुलींचा उत्तराखंडवर दणदणीत विजय, विदर्भासह कोल्हापूरची विजयी सलामी - विदर्भासह कोल्हापूरची विजयी सलामी

फलटणमध्ये सुरू झालेल्या ३२ व्या राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धेत (32nd National Championship Kho Kho Tournament ) महाराष्ट्राच्या मुलींच्या संघासह विदर्भाच्या मुलांनी आणि कोल्हापूरच्या मुले व मुलींच्या संघांनी विजयी सलामी दिली. महाराष्ट्राच्या मुलींच्या संघांने उत्तराखंडच्या संघावर दणदणीत विजय मिळवला.

Kho Kho Tournament
महाराष्ट्राच्या मुलींचा उत्तराखंडवर दणदणीत विजय

By

Published : Oct 30, 2022, 2:02 PM IST

सातारा :महाराष्ट्राच्या मुलींनी उत्तराखंडवर दणदणीत विजय मिळवला ( Maharashtra girls beat Uttarakhand ). फलटणमध्ये घडसोली मैदानावरील आमदार श्रीमंत शिवाजीराजे मालोजीराजे नाईक-निंबाळकर क्रीडा संकुलात ३२ वी राष्ट्रीय अजिंक्यपद खो-खो स्पर्धा सुरू झाली आहे. महाराष्ट्राच्या मुलींच्या संघासह विदर्भाच्या मुलांनी आणि कोल्हापूरच्या मुले व मुलींच्या संघांनी विजयी सलामी दिली. महाराष्ट्राच्या मुलींच्या संघांने उत्तराखंडच्या संघावर दणदणीत विजय मिळवला.

मुलींच्या संघाकडून उत्तराखंडचा डावाने धुव्वा :सकाळच्या सत्रात महाराष्ट्राच्या मुलींनी उत्तराखंडचा २०-१ असा एक डाव राखून धुव्वा उडविला. यात कर्णधार दीपाली कंक, धनश्री तामखडे यांनी अष्टपैलू खेळी केली. स्वप्नाली तामखडे हिने आपल्या धारदार अक्रमणात ४ गडी टिपले. दुसऱ्या सामन्यात राजू पाटीलच्या अष्टपैलू खेळीमुळे कोल्हापूरच्या मुलांनी केरळवर १७-११ अशी मात केली. राजूने चार गडी बाद करीत दोन मिनिटे संरक्षण केले.

कोल्हापूरच्या मुलींची दमदार सलामी : कोल्हापूरच्या मुलींनीही उत्तरप्रदेशवर १३-६ असा एक डाव राखून दणदणीत विजय ( Kolhapur girls win over Uttar Pradesh) मिळविला. अष्टपैलू कामगिरी करणारी चैत्राली वाडेकर ही कोल्हापूर संघाच्या विजयाची शिल्पकार ठरली. चैत्रालीने पहिला डावात ४.३० मिनिटे व दुसऱ्या डावात दोन २.२०मिनिटे नाबाद राहत आक्रमणातही चार गडी टिपले.

विदर्भाकडून हिमाचल प्रदेशचा डावाने पराभव : विदर्भाच्या मुलांनी हिमाचल प्रदेशचा १३-७ असा डावाने पराभव ( Vidarbha girls win over Himachal Pradesh) केला. विदर्भाच्या कृष्णा तायडे आणि मोहित नेवारे यांनी संरक्षणासह नाबाद राहून संघाला विजय मिळवून दिला. या विजयाने विदर्भानेही विजयी सलामी देत आगेकूच केली आहे.

पहिल्या दिवसातील अन्य निकाल : उत्तर प्रदेश डावाने विजयी विरूद्ध दिल्ली (२२-११), हरियाणा विजयी विरूद्ध तामिळनाडू (१३-११), पश्चिम बंगाल डावाने विजयी विरूद्ध गुजरात (१९-१३). मुली : हरियाणा डावाने विजयी विरूद्ध मध्य भारत (१८-३), गुजरात डावाने विजयी विरूद्ध बिहार (२४-०), दिल्ली डावाने विजयी विरूद्ध हिमाचल प्रदेश (१५-६).Conclusion:

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details