महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

जिल्हावासियांनी घरातच राहून कोरोनाचा मुकाबला करूया - पालकमंत्री बाळासाहेब पाटील - satara corona

कोरोनाचे संकट हद्दपार करण्यासाठी सर्व सातारा जिल्हावासियांनी घरातच राहून या संकटाचा मुकाबला करूया, असे आवाहन सहकार व पणन मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

सातारा
सातारा

By

Published : May 1, 2020, 3:57 PM IST

सातारा - कोरोनामुळे जगात आणि देशातही फार मोठा आर्थिक ताण येत आहे. कोरोनाचे संकट हद्दपार करण्यासाठी सर्व सातारा जिल्हावासियांनी घरातच राहून या संकटाचा मुकाबला करूया, असे आवाहन सहकार व पणन मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी केले.

महाराष्ट्र दिनाच्या 60 व्या वर्धापनदिनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पाटील यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. या समारंभाला गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराजे देसाई, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते असे मोजकेच मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्र्यांनी महाराष्ट्र दिनाच्या व कामगार दिनाच्या जनतेला शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री आणि सातारचे सुपुत्र स्व. यशवंतराव चव्हाण यांनी 1 मे 1960 रोजी महाराष्ट्राचा मंगल कलश आणला. त्यांच्या विचारातूनच महाराष्ट्र राज्य प्रगतीची वाटचाल करीत आहे. कोरोना संसर्ग वाढू नये यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्यात आला आहे. त्यामुळे राज्यावर आर्थिक ताण येत आहे. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी कुणीही आवश्यक काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. जिल्हा प्रशासनाने कडक निर्बंध केले आहेत. या निर्बंधाचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील व पर राज्यातील कामगारांमध्ये नैराश्याचे वातावरण निर्माण झालेले आहे. भविष्यात कामगारांना चांगले दिवस येतील. कामागारांनी चांगले काम करण्याच्या दृष्टीने दक्ष रहावे, असे आवाहनही पालकमंत्री पाटील यांनी केले.

ABOUT THE AUTHOR

...view details