सातारा - तौक्ते चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे सातारा जिल्ह्यात गेल्या २४ तासांपासून पावसाची संततधार सुरु आहे. या काळात सरासरी एकूण 22.53 मिली मीटर पाऊसाची नोंद झाली आहे. महाबळेश्वरमध्ये सर्वाधिक 94.7 मिली मीटर पाऊस झाला.
मोठी वित्तहानी
साताऱ्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात सरासरी एकूण 22.53 मिली मीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. फलटणमध्ये पाऊस झाला नाही तर माण, खंडाळा, कोरेगाव, खटाव या तालुक्यात अत्यल्प पाऊस झाला. या पावसामुळे महाबळेश्वर तालुक्यासह अनेक ठिकाणी महावितरण कंपनीचे विजेचे पोल उन्मळून पडले. तसेच अनेक ठिकाणी विज वहन यंत्रणेचे लाखोंचे नुकसान झाले. काही ठिकाणी वृक्ष उन्मळून पडल्याच्या दुर्घटना घडल्या. मात्र सुदैवाने जीवितहानीचा एकही प्रकार घडला नाही.