महाबळेश्वर (सातारा)- पाचगणी हे पर्यटनस्थळ तब्बल दोन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पर्यटकांसाठी खुली होत आहेत. सोमवारपासून पर्यटकांना निसर्गाबरोबरच खरेदीचा आनंद घेता येणार आहे. मात्र विविध पाँइटस् बंद राहणार असल्याने पर्यटकांना निवास, न्याहारी व जेवणाबरोबरच खरेदीचा आनंद घेता येईल.
तब्बल दोन महिन्यांची प्रतिक्षा
जिल्ह्यातील लाॅकडाऊनचे नियम शिथिल झाल्याने जिल्हाबंदी उठली आहे. महाबळेश्वर-पाचगणी ही पर्यटनस्थळे तब्बल दोन महिन्यांच्या प्रतिक्षेनंतर पर्यटकांसाठी खुली करण्यात आली आहेत. पाचगणीच्या दांडेघर नाक्यावर येणाऱ्या पर्यटकांची रॅपिड अॅन्टीजेन तपासणी करण्यात येणार आहे. विकेंडचे दोन दिवस म्हणजे शनिवार-रविवार अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवहार बंद राहणार आहेत. शिवाय सायंकाळी ५ नंतर जमावबंदी कायम असल्याने पावसाळी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांना लाॅजवर परतावे लागणार आहे. बाजारपेठही ५ नंतर बंदच राहणार आहे. उद्या (सोमवार) दोन महिन्यानंतर प्रथमच बाजारपेठ उघडणार आहे.
पर्यटकांचा हिरमोड