महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

माढा लोकसभा : राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात काय आहेत जनतेच्या मागण्या - शरद पवार

माढा लोकसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जातो.

माढा लोकसभेच्या मतदारांशी चर्चा करताना आमचे प्रतिनिधी महेश जाधव

By

Published : Apr 21, 2019, 5:35 PM IST

सातारा - माढा लोकसभेच्या उमेदवार कोण असणार यावर राज्य भरात चर्चेला ऊत आला होता. शरद पवार यांनी ऐनवेळी माघार घेतली. त्यानंतर अनेक राजकीय घटना या मतदारसंघात घडल्या. त्यात प्रामुख्याने मोहिते पाटलांनी भाजपच्या छत्रछायेचा आसरा घेतला. त्यामुळे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासाठी माढ्याची 'लढाई' अस्मितेची बनली. तेव्हा शरद पवारांनी संजय शिंदे यांना उमेदवारी देऊन मोहिते पाटलांना 'चेकमेट' देण्याचा डाव आखला आहे.


माढा मतदारसंघात एकूण १८ लाख ९४ हजार २६४ मतदार आहेत. त्यापैकी ९ लाख ९१ हजार हे पुरुष मतदार तर ८ लाख ९७ हजार ८६९ स्त्री मतदार आहेत. या मतदारसंघात करमाळा, माढा, सांगोला, माळशिरस, फलटण आणि सातारा जिल्ह्यातील माण-खटाव हे असे सहा तालुके येतात. या मतदारसंघात जनतेच्या काय मागण्या आहेत. याचा आढावा घेतला आहे. आमचे प्रतिनिधी महेश जाधव यांनी...

माढा लोकसभेच्या मतदारांशी चर्चा करताना आमचे प्रतिनिधी महेश जाधव

ABOUT THE AUTHOR

...view details