महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

साताऱ्यातील 'या' तालुक्यात सर्वात कमी कोरोनाबाधित आणि सर्वात जास्त गुन्हे आहेत दाखल... - कोरोना अपडेट न्यूज सातारा

माण तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शंभरी पार झाली असून, त्यापैकी 85 रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील तालुक्याच्या मानान माणमधील रुग्णांची संख्या कमी आहे.

Maan taluka has the lowest number of corona patients in Satara district
सर्वात कमी कोरोनाबाधित आणि सर्वात जास्त गुन्हे एकाच तालुक्यात

By

Published : Jul 30, 2020, 7:31 PM IST

सातारा -माण तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शंभरी पार झाली असून, त्यापैकी 85 रुग्ण बरे झाले आहेत. आत्तापर्यंत 5 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील तालुक्याच्या मानान माणमधील रुग्णांची संख्या कमी आहे. तालुक्यातील पोलीस प्रशासन व आरोग्य विभाग यांनी घेतलेल्या दक्षतेमुळे माण तालुक्यातील रुग्णसंख्या आटोक्यात आहे.

माण तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या पहिल्या पासूनच कमी होती. पोलीस प्रशासनाचे व आरोग्य विभागाचे सातत्यपूर्ण प्रयत्न आज यशस्वी ठरले. आरोग्य विभागाने गावोगावी सर्व्हे करून रुग्ण आढळलेल्या ठिकाणी त्यांच्या संपर्कात आलेल्या लोकांना सुरुवातीला होम क्वारणटाईन केले. नंतर सर्वांना कोरोना केअर सेंटरमध्ये ठेवले. त्यामुळे रुग्ण संख्या आटोक्यात आली. इतरांशी संपर्क तुटल्यामुळे साखळी तुटण्यास मदत झाली. आरोग्य विभागाने कोणाचीही गय न करता जबाबदारीने काम केले. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाने सुरूवातीपासूनच बाहेरून येणाऱ्या लोकांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत.

सर्वात जास्त गुन्हे

जिल्ह्यात सर्वात जास्त गुन्हे माण तालुक्यात दाखल झाले आहेत. पोलीस ठाण्याच्या कडक धोरणाने मोठा फायदा झाला. प्रवास करून आलेल्यांना होम क्वारणटाईन केले गेले. त्याचा फायदा झाला. तसेच पोलीस पाटील यांनीही चांगली मदत केली. गावागावात स्थापन केलेल्या समित्यांनीही दिलेली जबाबदारी व्यवस्थित पार पाडली. त्यामुळे सुरुवातीचे काही महिने माण तालुक्यात कोरोनाचा शिरकाव झाला नव्हत. परंतु, प्रशासनाने प्रवासास परवानगी दिल्यानंतर बाहेरून आलेल्या विशेषतः मुंबईहून जास्त कोरोना माणमध्ये आयात झाला. सुरुवातीला बाहेरून आलेल्या लोकांनांच कोरॉनाची लागण झाली होती. परंतु, त्यानंतर आता स्थानिक रहिवाशांनाही कोरोना होऊ लागला आहे. कोरोनाचा फैलाव गावपातळीवरही वाढला आहे. त्यामुळे माण तालुक्यात आत्तापर्यंत 104 रुग्ण आढळले आहेत. आरोग्य विभागाच्या चांगल्या प्रयत्नामुळे 85 रुग्ण पूर्ण बरे झाले आहेत. कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण चांगले आहे. ही समाधानाची बाब आहे. आत्तापर्यंत 5 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details