महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला, धरणात 102.75 टीएमसी पाणीसाठा - rainfall in satara

कोयना धरणात 102.75 टीएमसी पाणीसाठा आहे. धरणातील पाण्याची आवक कमी झाली असल्याने आज सकाळी 6 वाजलेपासून 13 फुटांवर धरणाचे दरवाजे स्थिर आहेत.

सातारा

By

Published : Aug 8, 2019, 9:29 AM IST

सातारा- कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला असून कोयना धरणाचे दरवाजे 13 फुटावर सध्या स्थिर आहेत. तसेच 1 लाख 20 हजार क्युसेकचा विसर्ग सध्या धरणातून सुरू आहे. यामुळे कराड शहराचा पुराचा धोका टळला आहे.

कोयना पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावला

कोयना धरणात 102.75 टीएमसी पाणीसाठा आहे. धरणातील पाण्याची आवक कमी झाली असल्याने आज सकाळी 6 वाजलेपासून 13 फुटांवर धरणाचे दरवाजे स्थिर आहेत.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील कोयना, नवजा, महाबळेश्वर येथे पावसाचा जोर मंदावला असून धरणातील पाण्याची आवक ही कमी झाली आहे. बुधवारी कोयना धरण व्यवस्थापनाने 14.6 फुटांवर स्थिर असलेले वक्र दरवाजे अखेर आज 13 फुटांवर घेतले आहेत. पाटण शहर परिसरात पावसाचा जोर कमी झाल्याने पाटणची पूरपरिस्थिती कमी झाली आहे. त्यामुळे पाटण बाजार पेठेतील पाणी ओसरले आहे. सध्या तरी पूरस्थिती कमी झाली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details