महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

सहकारमंत्र्यांच्या 'सह्याद्री' कारखान्यात 'ना नफा, ना तोटा' तत्वावर सॅनिटायझरचे उत्पादन सुरू - BALASAHEB PATIL

कोरोनाच्या संकटामुळे राज्यात सॅनिटायझरचा तुटवडा निर्माण झाला. बाजारात उपलब्ध असणाऱया सॅनिटायझरची काळ्या बाजाराने विक्री होऊ लागली. त्यामुळे शासनाने सहकारी साखर कारखान्यांना हॅण्ड सॅनिटायझरची निर्मिती करण्याची सूचना केली होती. त्यानुसार राज्यातील सुमारे 43 सहकारी साखर कारखान्यांनी हॅण्ड सॅनिटायझरचे उत्पादन सुरू केले आहे.

BALASAHEB PATIL
सहकार मंत्र्यांच्या 'सह्याद्री' कारखान्यात 'ना नफा, ना तोटा' तत्वावर सॅनिटायझरचे उत्पादन सुरू

By

Published : Apr 8, 2020, 8:09 PM IST

कराड (सातारा) - राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असणाऱ्या कराड तालुक्यातील सह्याद्री सहकारी साखर कारखान्याने ‘ना नफा, ना तोटा' तत्त्वावर हॅण्ड सॅनिटायझरची निर्मिती सुरू केली आहे. कोरोना संकटाच्या काळात सर्वसामान्यांना परवडेल, अशी किंमत ठेवण्यात आली आहे. 30, 50, 75, 100 आणि 500 रूपयांत हॅण्ड सॅनिटायझर कारखान्याने उपलब्ध केले असल्याचे पाटील यांनी सांगितले.

सहकार मंत्र्यांच्या 'सह्याद्री' कारखान्यात 'ना नफा, ना तोटा' तत्वावर सॅनिटायझरचे उत्पादन सुरू

कोरोनाच्या संकटामुळे राज्यात सॅनिटायझरचा तुटवडा निर्माण झाला. बाजारात उपलब्ध असणाऱया सॅनिटायझरची काळ्या बाजाराने विक्री होऊ लागली. त्यामुळे शासनाने सहकारी साखर कारखान्यांना हॅण्ड सॅनिटायझरची निर्मिती करण्याची सूचना केली होती. त्यानुसार राज्यातील सुमारे 43 सहकारी साखर कारखान्यांनी हॅण्ड सॅनिटायझरचे उत्पादन सुरू केले आहे. सह्याद्री कारखान्यानेही सॅनिटायझर निर्मिती सुरू केली असून, त्याची किंमत उत्पादन खर्चावर आधारित ठेवली आहे. सर्व करांसहीत आणि अतिशय माफक दरात सह्याद्री कारखान्याने सॅनिटायझरची किंमत ठेवली असल्याचे मंत्री पाटील म्हणाले.

100 मिली सॅनिटायझरची किंमत 30 रूपये, 200 मिलीची 50 रूपये, 500 मिलीची 75 रूपये, 1 लीटरची 100 रूपये आणि 5 लीटरची किंमत 500 रूपये ठेवली आहे. सह्याद्री कारखान्याने माफक दरात हॅण्ड सॅनिटायझर उपलब्ध केले आहे. कारखाना, कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील गट कार्यालयांमध्ये सॅनिटायझर ठेवण्यात आले आहे. ग्रामीण भागात सरपंच, ग्रामसेवकांनी पत्र दिल्यानंतर त्याच किमतीत सॅनिटायझर देण्यात येणार आहे. नगरपालिकेने मागणी केल्यानंतर त्यांनाही उपलब्ध करूण देण्यात येईल. बाजारातही सामान्यांना सॅनिटायझर मिळेल, असे पाटील यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details