सातारा- जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. यामुळे देशात संचारबंदी सुरू आहे. याचा फटका सर्व स्तरातील घटकांना बसत आहे. शेतकऱ्यांनाही याचा मोठा फटका बसत आहे. कारण, मागणी घटल्याने शेतकऱ्यांच्या मालाचे बाजार समितीमधून उठावच बंद आहे. कोरोनाच्या भीतीने शेतकरी तसेच मोठ्या शहरात जात नसल्याने मोठे नुकसान होत आहे.
#COVID 19 : संचारबंदीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान - satara news
संचारबंदीमुळे शेतकऱ्यांच्या मालाचा उठाव होत नसल्याने त्यांच्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. त्यामुळे गर्दी नसलेल्या भागातील मंडई सुरू करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
संचारबंदीमुळे वाहतूक व्यवस्था ठप्प झाली आहे. अत्यावश्यक सेवांची वाहतूक सुरू असली तरीही काही ठिकाणचे पेट्रोल पंप बंद असल्याने वाहतुकीवर परिणाम जाणवत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आपले पिक स्थानिक ठिकाणीच विकावे लागत आहे. स्थानिक ठिकाणी जास्त मागणी नसल्याने त्यांच्या पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी होत आहे. त्यामुळे गर्दी नसलेल्या भागातील मंडई सुरू करावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.
हेही वाचा -शिवभोजन थाळीचा गोरगरिबांनी लाभ घ्यावा; उपविभागीय अधिकारी श्रीरंग तांबे यांचे आवाहन