महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'कमाई नसली तरी भुकेल्यांच्या तोंडी घास भरवू,' शेतकऱ्याकडून गोरगरिबांना २ टन भाजीचे वाटप - गर्दीमुळे कोरोना प्रसाराची भीती

अशोक अवघडे यांनी २ टन भाजीपाल्यासह वांगी, टोमॅटो, काकडी, डब्बू मिरची, दोडका आदी शेतमाल काढून तो स्वतः गरजूंपर्यंत पोहोचवला. सध्याच्या परिस्थितीत सर्वजण हतबल आहेत. मात्र शेतमाल उद्धवस्त करण्यापेक्षा एखाद्या भुकेल्याच्या मुखी गेला घास गेला तर त्यापेक्षा दुसरे भाग्य नाही, असे ते म्हणाले.

'कमाई नसली तरी भुकेल्यांच्या तोंडी घास भरवू,' शेतकऱ्याकडून गोरगरिबांना २ टन भाजीचे वाटप
'कमाई नसली तरी भुकेल्यांच्या तोंडी घास भरवू,' शेतकऱ्याकडून गोरगरिबांना २ टन भाजीचे वाटप

By

Published : May 5, 2020, 10:08 AM IST

सातारा - लॉकडाऊनमध्ये सर्व स्तरांवरील व्यवहार ठप्प झाले आहेत. जगाचा पोशिंदा शेतकरी मात्र यामध्ये सर्वांच्या हाकेला खंबीर उभा आहे. या काळात अनेक शेतकऱ्यांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. अशात डगमगून न जाता पाटण तालुक्यातील किल्ले मोरगिरी येथील शेतकरी अशोक अवघडे यांनी आपल्या शेतात पिकलेला २ टन भाजीपाला परिसरातील गोरगरीब जनतेसह कोरोनाच्या युध्दात २४ तास तत्पर असलेले पोलीस जवान, महसूल विभागाचे कर्मचारी, आरोग्य रक्षकांना मोफत देऊन समाजात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे.

किल्ले मोरगिरीमधील अशोक अवघडे हे मुंबई येथे स्वत:च्या व्यवसायाच्या निमित्ताने वास्तव्यास आहेत. परंतु, गेल्या तीन ते चार वर्षात त्यांनी आपल्या गावानजिक शेतजमीन घेऊन त्यामध्ये शेतमाल पिकवण्यास सुरवात केली. सध्या लॉकडाऊनमुळे अनेक व्यवसाय अत्यंत अडचणीत आलेले आहेत. जगाचा पोशिंदा शेतकरी मात्र सर्वांच्यासाठी कंबर कसून उभा आहे. काही ठिकाणी हवालदिल होऊन अनेक शेतकऱ्यांनी आपल्या शेतीमालावरती ट्रॅक्टर, पोकलँड फिरवून शेतमाल उद्धवस्त केलेले सोशल मीडियावरील व्हिडिओ, टीव्ही व वृत्तपत्राच्या बातम्यांमधून पाहत आहोत.
परंतु, किल्ले मोरगिरी येथील अशोक अवघडे या शेतकऱ्याने आपल्या शेतातील भाज्या गोरगरीब आणि गरजूंना वितरित केल्या.

अशोक अवघडे यांनी २ टन भाजीपाल्यासह वांगी, टोमॅटो, काकडी, डब्बू मिरची, दोडका आदी शेतमाल काढून तो स्वतः गरजूंपर्यंत पोहोचवला. कसलाही गाजावाजा किंवा जाहिरातबाजी न करता त्यांनी हे सर्व केले. अवघडे यांनी स्वत: प्रत्येक ठिकाणी जात लोकांना भाजीपाल्याचे मोफत वाटप केले. त्यांच्याशी संवाद साधाला असता, 'सध्याच्या परिस्थितीत सर्वजण हतबल आहेत. मात्र शेतमाल उद्धवस्त करण्यापेक्षा एखाद्या भुकेल्याच्या मुखी गेला घास गेला तर त्यापेक्षा दुसरे भाग्य नाही. सध्याच्या परिस्थितीमध्ये 'जित जाएंगे हम, लेकिन साथ अगर सब हो'' असे त्यांनी सांगितले. त्यांच्या या उपक्रमाचे पाटण तालुक्यातील जनता तोंड भरून कौतुक करत आहे. अशोक अवघडे यांचा आदर्श इतर शेतकऱ्यांनी घेऊन शेतमाल फुकट न घालवता गोरगरिबांच्या मुखात घालावा, असे अनेक जण म्हणत आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details