सातारा - कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आजपासून १७ ते २६ जुलै दरम्यान कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. टाळेबंदीमुळे नागरिकांना सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या २ हजार १०० पेक्षा जास्त झाली आहे. जिल्ह्यातील सर्व किराणा दुकाने, किरकोळ व ठोक विक्रेते, इतर सर्व व्यवसाय, व्यापारी दुकाने आजपासून २२ जुलैपर्यंत संपूर्णत: बंद राहणार आहेत.
सातारा जिल्ह्यात आजपासून लॉकडाऊन; वर्दळीच्या ठिकाणी पोलिसांचा कडक बंदोबस्त - satara lockdown news
लॉकडाऊनमुळे जिल्ह्यातील सातारा, कराड या मुख्य ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात येत आहेत तर काही ठिकाणी दंडात्मक कारवाई केली जात आहे.
२२ ते २६ जुलै कालावधीत सकाळी ९ ते दुपारी २ वाजेपर्यंत केवळ अत्यावश्यक वस्तुंचा पुरवठा करणारी दुकाने व त्यांचे ठोक विक्रेते यांची दुकाने सुरू ठेवता येणार आहेत. इतर सर्व दुकाने बंद राहणार आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना पोहोचला आहे. त्याचबरोबर आता मिनी मंत्रालय समजल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेतही कोरोनाचा शिरकाव झाला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत यांनी जिल्हा परिषदेचे कामकाज दोन दिवस बंद ठेवले आहे.
जिल्ह्यातील सातारा, कराड या मुख्य ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. अनेक ठिकाणी गुन्हे दाखल करण्यात येत आहेत तर काही ठिकाणी दंडात्मक कारवाई केली जात आहे.