सातारा - जिल्ह्यातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले व राजमाता छत्रपती कल्पनाराजे भोसले यांच्या खासगी मालकीचे असणारे शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाचे मंदिर 3 महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे येथील व्यावसायिक तसेच सेवाधारी यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. त्यामुळे 'शंभू महादेवा... उघड आता दार', अशी प्रार्थना येथील व्यावसायिक करत आहेत.
'शंभू महादेवा... उघड आता दार', शिंगणापुरातील व्यावसायिकांची आर्त हाक - शिखर शिंगणापूर व्यवयायीक न्यूज
सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर येथील शंभू महादेवाचे मंदिर 3 महिन्यापासून बंद आहे. त्यामुळे येथील व्यावसायिक तसेच सेवाधारी यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे.
उत्पन्नाचा सीझन वाया गेला
शिंगणापूर येथील शंभू महादेवाच्या दर्शनासाठी चैत्र यात्रेपासून श्रावण महिन्यापर्यंत भाविकांची गर्दी असते. चैत्र यात्रा, उन्हाळी सुट्टी, ग्रामीण यात्रा, लग्नसराई, आषाढीवारी व श्रावण महिना अशी सलग चार महिने भाविकांची वर्दळ असल्याने येथील व्यावसायिकांची कोट्यवधींची उलाढाल होते. परंतू, कोरोनाच्या संकटामुळे मंदिर बंद असल्याने यावर्षी उत्पनाचा मुख्य सिझन वाया गेल्याने यापुढील आठ महिने कसे काढायचे असा प्रश्न येथील व्यवसायिकांसमोर निर्माण झाला आहे.