सातारा - विजेच्या खांबावर काम करत असताना विजेचा धक्का बसल्याने खासजी वायरमनचा जागीच मृत्यू झाला. माण तालुक्यातील पाचवड येथे ही घटना घडली. गावातील विजेच्या प्रवाहात बिघाड झाल्याने तो दुरूस्तीचे काम असताना ही दुर्घटना घडली.
अशी घडली घटना

रदीप जगन्नाथ खरात (वय ३०, रा. तोंडले ता. माण) असे या खाजगी वायरमॅनचे नाव आहे. पाचवड व अनभुलेवाडी येथील वीजप्रवाहात बिघाड झाला होता. त्यामुळे दहिवडी वीजवितरण कंपनीमार्फत प्रदीप खरात हा सकाळी १० वाजता पाचवड गावात दुरूस्तीसाठी आला. वीजप्रवाह बंद करून तो खांबावर चढला. मात्र विद्युत वाहिनीत पुन्हा प्रवाह आल्याने त्याला जोरदार धक्का बसला. धक्का लागल्याने तो तारांत अडकून पडल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती चंद्रकांत जगदाळे यांनी संबंधित वीजवितरण कंपनी व पोलिसांना दिली. त्यानंतर अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
नातेवाईकांचा आक्रोश
दरम्यान मृत युवकाच्या नातेवाईकांनी संबंधित ठेकेदार आल्याशिवाय मृतदेह खांबावरून खाली घेण्यास नकार दिला. परंतु, पोलीस उपनिरीक्षक प्रमोद दीक्षित यांच्या मध्यस्तीने मृतदेह खाली घेण्यात आला. प्रदीप खरातची आर्थिक परिस्थिती नाजूक होती. गेल्या तीन वर्षांपासून तो कराडच्या ठेकेदाराकडे खाजगी वायरमॅन म्हणून काम करत होता.