सातारा - कोयना धरणातील उपलब्ध पाणीसाठा ( Water storage available in Koyna Dam ) शेती सिंचनासाठी आरक्षित ( Water reserved for agricultural irrigation ) असल्याने पश्चिमेकडील वीजनिर्मितीवर मर्यादा ( Limit on power generation ) आल्या आहेत. धरणाच्या पायथा वीजगृहातून सुरू असलेला विसर्गही आज (शुक्रवारी) सकाळी बंद करण्यात आला आहे. धरणात सध्या 15 टीएमसी पाणीसाठा ( balance 15 TMC water ) शिल्लक आहे.
पायथा वीजगृहातील विसर्ग बंद - पुर्वेकडील सिंचनासाठी धरणाच्या पायथा वीजगृहातून नदीपात्रात पाणी सोडण्यात येत होते. परंतु, पावसाने दडी मारल्याने धरणातील पाणीसाठा कमालीचा खालावला. पश्चिमेकडील वीजनिर्मितीसाठी 0.2 टीएमसी आणि पायथा वीजगृहातून 2100 क्युसेक पाणी सिंचनासाठी सोडण्यात येत होते. आज सकाळी पायथा वीजगृहातील विसर्ग बंद करण्यात आला आहे. धरणातील उर्वरीत पाणीसाठा हा सिंचनासाठी आरक्षित असल्याने वीजनिर्मितीवर मर्यादा आल्या आहेत.
पश्चिमेकडील वीजनिर्मितीवर मर्यादा -धरणातील पाणीसाठा खालावत चालल्यामुळे पश्चिमेकडील वीजनिर्मितीवर मर्यादा आल्या आहेत. वीजनिर्मितीसाठी पाण्याचा वापर कमी करण्यात आला आहे. त्यामुळे वीजमिर्मिती कमी क्षमतेने होत आहे. दि. 1 जूनपासून पश्चिमेकडील वीज प्रकल्पासाठी 2.8 टीएमसी आणि पुर्वेकडील सिंचनासाठी ( Water being released for irrigation ) 2.44 टीएमसी पाण्याचा वापर झाला आहे. उर्वरीत पाणीसाठा सिंचनासाठी आरक्षित आहे. त्यामुळे कोयनेच्या वीजनिर्मितीवर मोठा परिणाम ( Big impact on power generation ) होऊ लागला आहे. सध्या धरणात 20 दिवस पुरेल इतका पाणीसाठा राहिला आहे. दमदार पावसाला सुरूवात न झाल्यास वीजनिर्मितीसह सिंचनाचा प्रश्न गंभीर होऊ शकतो.