सातारा :शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त शिवतीर्थावर मोठ्या संख्येने शिवसैनिकांनी बाळासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यासाठी रीघ लावली आहे. साताऱ्यात शिवसैनिकांनी मशाली पेटवून ( Shiv Sainiks lit torches ) गद्दारांना त्यांची जागा दाखवून देण्याची शपथ घेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Shiv Sena chief Balasaheb Thackeray ) यांचा स्मृतिदिन साजरा ( Celebrating Memorial Day ) केला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्यावतीने शिवसेनाप्रमुखांच्या स्मृतिदिनानिमित्त पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर शिवसैनिकांनी मशाली पेटविल्या.
Balasaheb Thackeray Memorial Day : शिवसैनिकांनी पेटविल्या मशाली; गद्दारांना जागा दाखण्याची घेतली शपथ
साताऱ्यात शिवसैनिकांनी मशाली पेटवून ( Shiv Sainiks lit torches ) गद्दारांना त्यांची जागा दाखवून देण्याची शपथ घेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे ( Shiv Sena chief Balasaheb Thackeray ) यांचा स्मृतिदिन साजरा ( Celebrating Memorial Day ) केला. यापुढे शिसेनेसोबत जे घडेल त्याला त्याच पद्धतीने प्रत्त्युतर देऊन गद्दारांना त्यांची जागा दाखवून देण्याची शपथ शिवसैनिकांनी घेतली.
गद्दारांना त्यांची जागा दाखवून देण्याची शपथ: छत्रपती शिवाजी महाराज की जय, हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे अमर रहे, जय भवानी, जय शिवाजी, उद्धव ठाकरे तुम आगे बढो, कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, अशा घोषणा देण्यात आल्या. तसेच यापुढे शिसेनेसोबत जे घडेल त्याला त्याच पद्धतीने प्रत्त्युतर देऊन गद्दारांना त्यांची जागा दाखवून देण्याची शपथ शिवसैनिकांनी घेतली. यावेळी माजी जिल्हाप्रमुख नरेंद्र पाटील, सातारा शहर प्रमुख बाळासाहेब शिंदे, अमोल आवळे यांच्यासह शिवसैनिक, महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या. शिवसेनेने मराठी माणसाला ताठ मानेने जगण्याचा मंत्र दिला, असे म्हणत बाळासाहेबांना नरेंद्र पाटील यांनी मानवंदना दिली. शिसेनेसोबत जे घडेल त्याला त्याच पद्धतीने प्रत्त्युतर देऊन गद्दारांना त्यांची जागा दाखवून देणार असे गणेश अहिवळे यांनी सांगितले.
बाळासाहेबांचे स्मृतीस्थळ : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वयाच्या ८६व्या वर्षी १७ नोव्हेंबर २०१२ रोजी निधन झाले. बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्क मैदान आपल्या भाषणांनी गाजवले होते. यामुळे याच दादर शिवाजी पार्क मैदानात बाळासाहेबांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांचे स्मृतीस्थळ उभारण्यात आले आहे. या स्मृतीस्थळाला २३ जानेवारीला बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्त तसेच स्मृतिदिनी मोठ्या संख्येने शिवसैनिक भेट देवून बाळासाहेबांना अभिवादन करतात.