सातारा : डरकाळ्या फोडणारा बिबट्या जखमी आहे की कशामध्ये फसलाय, याचा शोध घेण्यासाठी वनविभागाने थर्मल सेन्सर ड्रोन कॅमेऱ्याचा (Thermal sensor drone camera) वापर केला. पुणे येथील रेस्क्यू टीमच्या मदतीने केलेल्या ड्रोन चित्रीकरणात नर-मादी बिबट्याची जोडी ही प्रजननासाठी एकत्र आल्याची बाब स्पष्ट झाली. जिल्ह्यात अशा प्रकारची रेस्क्यू मोहीम ठरली.(Leopards in Satara)
जिल्ह्यात प्रथमच थर्मल सेन्सरचा वापर : बिबट्याच्या डरकाळ्यांमुळे तो जखमी अथवा अडचणीत असावा म्हणून वनविभागाने डोंगर परिसरात रेस्क्यू ऑपरेशन राबवले. त्यासाठी जिल्ह्यात प्रथमच थर्मल सेन्सर ड्रोन कॅमेऱ्याचा वापर केला गेला. कराड वनविभाग आणि पुणे येथील रेस्क्यू टीमने केलेल्या चित्रीकरणात दोन बिबटे दिसून आले. नर आणि मादी बिबट्याच्या जोडीचा वावर स्पष्ट झाला. तसेच बिबट्या जखमी अथवा अडचणीत नसल्याचे स्पष्ट झाले.