महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jan 21, 2022, 4:26 AM IST

Updated : Jan 21, 2022, 6:36 AM IST

ETV Bharat / state

Leopard Attack Child In Karad : थराराक, मुलाला जबड्यात पकडलेल्या बिबट्याशी बापाने दिली झुंज

पाच वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार कराड तालुक्यातील किरपे गावात समोर आला ( Leopard Attack Child In Karad ) आहे. बिबट्याने जबड्यात धरलेल्या मुलाचे वडिलांनी पाय ओढत आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली आहे.

Leopard Attack
Leopard Attack

कराड - वडिलांना शेजी औजार उचलून देण्यासाठी खाली वाकलेल्या पाच वर्षांच्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार कराड तालुक्यातील किरपे गावात समोर ( Leopard Attack Child In Karad ) आला आहे. बिबट्याने जबड्यात धरलेल्या मुलाचे वडिलांनी पाय ओढत आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकली. ही घटना सायंकाळी सहाच्या सुमारास घडली.

राज धनंजय देवकर, असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या मुलाचे नाव ( Leopard Attack Child Injured ) आहे. त्याला तात्काळ कराडच्या कृष्णा रूग्णालयात दाखल करण्यात आले ( Karad Krushna Hospital ) आहे. बिबट्याचा हल्ल्यात मुलाच्या मानेवर आणि पाठीवर खोल जखमा झाल्या आहेत.

तारेच्या कुंपनामुळे मुलाचा जीव वाचला

धनंजय देवकर यांचे वांग नदीकाठाकडे शेत आहे. शेतात वांग्याची तोडणी सुरु असून, त्यांचा मुलगाही तिथे होता. सायंकाळच्या सुमारास शेतातील कामे आटोपून घरी जाण्यापुर्वी औजारे गोळा करताना मुलगा कैची उचलण्यासाठी खाली वाकला. तेव्हा दबा धरून बसलेल्या बिबट्याने झडप घालून मुलाची मान जबड्यात पकडत त्याला ओढून नेण्याचा प्रयत्न केला. पण, शेताच्या बाजुला असणार्‍या तारेच्या कुंपनात बिबट्या अडकला. मुलाच्या वडीलाने मुलाचे पाय ओढत बिबट्याला हुसकावून लावले. हल्ल्याची माहिती मिळताच सहायक वनसंरक्षक महेश झांझुर्णे, वनक्षेत्रपाल तुषार नवले, मानद वन्यजीव राक्षक रोहन भाटे, वनपाल व वनरक्षक, किरपे गावचे पोलीस पाटील तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते.

मानवी रक्ताला बिबट्या चटावला..?

दोन महिन्यापुर्वी येणके येथे ऊसतोड मजुराच्या मुलावर बिबट्याने शेतात ओढून नेऊन ठार केले होते. त्यानंतर आता थोड्याच अंतरावर असलेल्या किरपे गावात पुन्हा बिबट्याने हल्ला केला आहे. त्यामुळे मानवी रक्ताला हा बिबट्या चटावला असावा. वनविभागाने बिबट्याचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.

हेही वाचा -Remo Dsouza Brother In Law Suicide : प्रसिद्ध कोरिओग्राफर रेमो डिसूझाच्या मेहूण्याची आत्महत्या; कारण अस्पष्ट

Last Updated : Jan 21, 2022, 6:36 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details