कराड (सातारा) -पाटण तालुक्यातील मारूल हवेली गावातील शेतात आजारी अवस्थेत सापडलेल्या बिबट्याचा उपचार सुरू असताना सोमवारी मृत्यू झाला आहे. न्यूमोनियामुळे बिबट्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज पशुसंवर्धन अधिकार्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, मागील आठवड्यात न्यूमोनियाने मृत्यू झालेला आणि सडलेल्या अवस्थेतील बिबट्याचा मृतदेह कराड तालुक्यातील पश्चिम सुपने गावात आढळून आला होता.
अखेर 'त्या' बिबट्याचा उपचारादरम्यान मृत्यू - Satara District Latest News
या बिबट्यावर उपचार करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान या बिबट्याचा मृत्यू झाला. मृत्यू झालेला बिबट्या हा दीड वर्ष वयाची मादी होती. बिबट्याचे शवविच्छेदन करून दहन करण्यात आले.
निमोनियामुळे बिबट्याचा मृत्यू
वन्यजीव अपराध नियंत्रण ब्युरोचे सदस्य तसेच मानद वन्यजीव रक्षक रोहन भाटे आणि वनक्षेत्रपाल विलास काळे यांना मारुल हवेली गावातील रानात एक बिबट्या आजारी अवस्थेत आढळून आला होता. त्यानंतर त्यांनी पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय हिंगमीरे यांना घटनास्थळी बोलावले. या बिबट्यावर उपचार करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान या बिबट्याचा मृत्यू झाला. मृत्यू झालेला बिबट्या हा दीड वर्ष वयाची मादी होती. बिबट्याचे शवविच्छेदन करून दहन करण्यात आले.