महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Leopard dead : बिबट्या आढळला मृतावस्थेत ; सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या हद्दीत नवजा येथील घटना

सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या ( Sahyadri Tiger Reserve ) हद्दीत नवजा (ता. पाटण) वनपरिक्षेत्रात बिबट्या रस्त्यालगत मृतावस्थेत आढळून ( Leopard dead body found in Sahyadri Tiger Reserve ) आला आहे. बिबट्याचा मृत्यू हा अपघात की घातपात, हे स्पष्ट झालेले नाही. दरम्यान, बिबट्याचा मृत्यू ( Leopard dead ) अतिवयोमान आणि आजाराने झाला असल्याचा दावा वन्यजीव विभागाने केला आहे. तीन दिवसांपूर्वी या बिबट्याचा मृत्यू झाला आहे.

Leopard dead
बिबट्या मृतावस्थेत

By

Published : Dec 23, 2022, 9:40 PM IST

सातारा : जिल्ह्यात मृत बिबट्या ( Leopard dead ) आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पश्चिम घाटावरील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या ( Sahyadri Tiger Reserve ) हद्दीत नवजा (ता. पाटण) वनपरिक्षेत्रात हा बिबट्या रस्त्यालगत मृतावस्थेत ( Leopard dead body found in Sahyadri Tiger Reserve ) आढळून आला आहे. दरम्यान, बिबट्याचा मृत्यू अतिवयोमान आणि आजाराने झाला असल्याचा दावा वन्यजीव विभागाने केला आहे.

तीन दिवसांपूर्वी बिबट्याचा मृत्यू : सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातील नवजा नियतक्षेत्रात रामबाण तीर्थक्षेत्राशेजारी रस्त्यावर बिबट्या मृतावस्थेत आढळून आला. तीन दिवसांपूर्वी बिबट्याचा मृत्यू झाला आहे. पशुधन विकास अधिकारी अतुल पाटणे, पशु वैद्यकिय अधिकारी वाकतकर यांनी बिबट्याचे शवविच्छेदन केल्यानंतर बिबट्याचा मृत्यू अतिवयोमानाने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज वन्यजीव विभागाने वर्तविला आहे.


मृत बिबट्याचा अहवाल : बिबट्याच्या मृत्यू ( Leopard dead ) प्रकरणी कोयना वनपरिक्षेत्रात वनगुन्हा नोंद करण्यात आला असून शवविच्छेदना दरम्यान बिबट्याचे अवयव वैद्यकीय तपासणी करिता काढून घेण्यात आले आहेत. त्याची तपासणी झाल्यानंतर या बिबट्याचा मृत्यू घातपातामुळे की अपघातामुळे झाला हे स्पष्ट होणार असल्याचे वन परिक्षेत्र अधिकारी एस. पी. गोडसे यांनी सांगितले. दरम्यान, मृत बिबट्याचा बिबट्याचा मृत्यू हा अतिवयोमान, किडनी निकामी झाल्याने आणि लघवी तुंबल्याने झाला असल्याचा अहवाल वन्यजीव विभागाला दिला असल्याची माहिती पशुधन विकास अधिकारी डॉ. अतुल पाटणे यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details