सातारा - पुणे-बंगळूर महामार्गावर, साताऱ्याजवळ रस्ता ओलांडणाऱ्या बिबट्याला रात्री अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबट्याचा जागीच मृत्यू झाला. सहाय्यक वनसंरक्षक किरण कांबळे, साताऱ्याच्या वनक्षेत्रपाल शितल राठोड, वनरक्षक सुनील भोसले, धोंडवड यांनी पाहणी केली. वन विभागाच्या गोडोली येथील रोपवाटीकेत पशू वैद्यकीय अधिकाऱ्यांनी शवविच्छेदन केले. दहन करून मृतदेह नष्ट करण्यात येणार असल्याचे वन अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
डोक्याला मार लागल्याने मृत्यू
औद्योगिक वसाहतीमधून कामावरून घरी निघालेल्या काही कामगारांना महामार्गावर बिबट्या मृतावस्थेत दिसला. त्यांनी वनविभागाला खबर दिल्यानंतर वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले. सातारा तालुक्यातील शेंद्रे गावाजवळ हा अपघात झाला. साधारण अडीच वर्षे वयाचा हा नर बिबट्या आहे. बिबट्याच्या पायाच्या नख्या सुस्थितीत आहेत. डोक्याला जोराचा मार लागल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.
हेही वाचा -साखरपा बाजारपेठ : बिबट्या जिन्याने गेला घराच्या दुसऱ्या मजल्यावर, नागरिकांमध्ये भीती
तिसऱ्या बिबट्याचा बळी