कराडमधील तांबवे गावात ९ वर्षाच्या मुलावर बिबट्याचा हल्ला - कराडमधील तांबवेमध्ये मुलावर बिबट्याचा हल्ला
कराड तालुक्यातील तांबवे गावात बिबट्याने ९ वर्षाच्या मुलावर हल्ला केल्याची घटना सायंकाळच्या सुमारास घडली. या हल्ल्यात मुलगा किरकोळ जखमी झाला आहे. राज दीपक यादव असे जखमी मुलाचे नाव आहे. भरवस्तीत आलेल्या बिबट्याने मुलाच्या पाठीवर पंजाने हल्ला केला आहे.
कराड (सातारा) - कराड तालुक्यातील तांबवे गावात बिबट्याने ९ वर्षाच्या मुलावर हल्ला केल्याची घटना सायंकाळच्या सुमारास घडली. या हल्ल्यात मुलगा किरकोळ जखमी झाला आहे. राज दीपक यादव असे जखमी मुलाचे नाव आहे. भरवस्तीत आलेल्या बिबट्याने मुलाच्या पाठीवर पंजाने हल्ला केला आहे. सुदैवाने लोकांनी आरडाओरडा केल्याने बिबट्याने तेथून धूम ठोकला. दोन दिवसापुर्वीच बिबट्या जनावरांच्या शेडमध्ये शिरला होता. त्यानंतर आता लहान मुलावरच हल्ला केल्याने शेतकरी शेतात जायला घाबरत आहेत.