सातारा- साजूर आणि गारवडे गावांच्या हद्दीवर असलेल्या डुबलकी शिवारात मंगळवारी रात्री तरूणांना बिबट्याचे दर्शन झाले. साजूर गावात सुमारे महिन्याभरापूर्वी या बिबट्याने शेतकर्यांवर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच, आता पुन्हा बिबट्या दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
महिन्याभरापूर्वी शेतकर्यांवर हल्ला करणाऱ्या बिबट्याचे पुन्हा दर्शन - sajur leapard news
सुमारे महिन्याभरापूर्वी डुबलकी शिवारात बिबट्याने शेतकर्यांवर हल्ला केल्याची घटना ताजी असतानाच, आता पुन्हा बिबट्या दिसल्याने शेतकऱ्यांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे परिसरात वन विभागाने पिंजरा लावण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे.
हेही वाचा- व्हॉट्सअपने नवीन गोपनीयतेचे धोरण मागे घ्यावे- केंद्र सरकारचे निर्देश
साजूर येथील डुबलकी शिवाराजवळच डोंगर असल्याने येथे वन्यश्वापदांचा सतत वावर असतो. या ठिकाणी नर,मादी बिबट्या आणि दोन बछडे वावरत असल्याचे शेतकर्यांना पहायला मिळाले. गेल्या महिन्यात बछड्यांमुळे बिथरलेल्या बिबट्याने दोन शेतकर्यांवर हल्ला केल्यानंतर शेतकरी शेतात जायचे टाळत होते. आता पुन्हा बिबट्याचे दर्शन झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भिती निर्माण झाली असून परिसरात वन विभागाने पिंजरा लावण्याची मागणी शेतकर्यांनी केली आहे.