महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'आमदार बाळसाहेब पाटील हे कराड उत्तरला लागलेले ग्रहण'

आमदार बाळासाहेब पाटील हे कराड उत्तर विधानसभा मतदार संघाला लागलेले ग्रहण आहेत. उद्याच्या निवडणुकीत निष्क्रीयतेचे हे ग्रहण सुटेल आणि धैर्यशील कदमांच्या रूपाने विकासाची पहाट होईल, असा विश्वास सातारा जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते भीमराव पाटील यांनी व्यक्त केला आहे.

सातारा जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते भीमराव पाटील

By

Published : Oct 19, 2019, 4:16 AM IST

सातारा - यशवंतराव चव्हाणांच्या विचारांची टीमकी वाजवणारे आणि नेमके त्याउलट वागणारे आमदार बाळासाहेब पाटील हे कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाला लागलेले ग्रहण आहेत. उद्याच्या निवडणुकीत निष्क्रीयतेचे हे ग्रहण सुटेल आणि धैर्यशील कदमांच्या रूपाने विकासाची पहाट होईल, असा विश्वास सातारा जिल्हा परिषदेचे विरोधी पक्ष नेते भीमराव पाटील यांनी व्यक्त केला आहे. सातारा लोकसभा पोटनिवडणुकीतील महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले आणि कराड उत्तर विधानसभा मतदार संघातील उमेदवार धैर्यशील कदम यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते.

कराड उत्तरच्या आमदारांनी गेल्या 20 वर्षांत विधानसभेत तोंडही उघडले नाही. त्यामुळे मतदार संघातील वाड्या-वस्त्या मागासलेल्याच राहिल्या, असा आरेपही त्यांनी केला आहे. या भागाचा कायापालट करण्यासाठी धैर्यशील कदम यांच्यासारख्या खंबीर नेतृत्वामागे महायुती उभी राहिली आहे. त्यामुळे यंदा कराड उत्तरमध्ये परिवर्तन घडणार असेही ते म्हणाले.

हेही वाचा -पाऊस.. प्रचार अन् पवार...

पाटील पुढे म्हणाले, माझ्याकडे कोणतेही पद नाही. परंतु, युती शासनाच्या माध्यमातून कराड उत्तरमधील रखडलेल्या योजनांसाठी मी निधी आणला. विद्यमान आमदारांची वीस वर्षांची कारकीर्द निष्क्रीय ठरली आहे. कराड उत्तरमधील तिसर्‍या उमेदवाराने पाच वर्षात कीती लोकांच्या अडचणी सोडवल्या, कीती निधी आणला याचे जनतेला उत्तर द्यावे, असा टोलाही त्यांनी मनोज घोरपडे यांना लगावला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details