सातारा -वडजल (ता. फलटण) परिसरात एका व्यक्तीचा गळा चिरून खून झाल्याची माहिती समोर आली आहे. प्रकाश फोरमन पवार (वय 40, रा. शिंदेवाडी नजीक साखरवाडी) यांचा धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून खून करण्यात आला होता. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.
फलटण खून प्रकरणी दोन जणांना अटक - Satara Crime News
फलटण तालुक्यातील वडजल परिसरात एका व्यक्तीचा गळा चिरून खून झाला होता. या प्रकरणी एलसीबीने दोघांना अटक केली आहे.
फलटण खून प्रकरणी दोघाना अटक
या घटनेचा छडा स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने लावला आहे. या प्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. रोशन अविनाश भोसले (वय 20 रा. इंदिरानगर झोपडपट्टी अकलूज) सानी चंद्रकांत भोसले (वय 18, बडेखान ता. फलटण जि. सातारा) या दोघांना अटक करण्यात आली आहे.