सातारा - जिल्ह्यात मागील 24 तासात 2 हजार 217 नागरिकांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तर 44 बाधितांचा मृत्यू झाला. एकट्या सातारा तालुक्यात 494 बाधितांची नोंद झाली आहे. आज (शनिवारी) संध्याकाळपर्यंत 440 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याचे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी सांगितले.
सातारा जिल्ह्यात 2 हजार 217 कोरोनाबाधित; 44 जणांचा मृत्यू - सातारा कोविड सेंटर
जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 440 नागरिकांना घरी सोडण्यात आले. तर 20 हजार 640 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.तर 44 बाधितांचा मृत्यू झाला. एकट्या सातारा तालुक्यात 494 बाधितांची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात आज जावली तालुक्यात 173, कराड 263, खंडाळा 134, खटाव 206, कोरेगांव 207, माण 144, महाबळेश्वर 76, पाटण 77, फलटण 278, सातारा 494, वाई 134 व इतर 31 असे रुग्ण आढळले. आज अखेर एकूण 1 लाख 7 हजार 472 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत. तर आज सातारा 13, कराड 10, खटाव 6, फलटण 6, वाई 4, खंडाळा 3 या तालुक्यांत इतके मृत्यू झाले आहेत. जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या 440 नागरिकांना घरी सोडण्यात आले. तर 20 हजार 640 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरु आहेत.