सातारा -जिल्ह्यातील सातारा - महाबळेश्वर रस्त्यावरील केळघर घाटात सकाळी दरड कोसळली. रस्त्यावर मोठमोठे दगड, मुरूम चिखल आल्यामुळे रस्ता पूर्णपणे बंद झाला आहे. बांधकाम विभाग पोलीस विभागाचे अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. दरड हटवण्याचे काम सुरू आहे. मुसळधार पावसामुळे दरड हटवण्यात अडचणी येत आहेत.
सातारा-महाबळेश्वर रस्त्यावर दरड कोसळली, वाहतूक ठप्प - पोलीस विभाग
काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे या घाटात लहान दरडी कोसळत होत्या. मात्र, शनिवारी सकाळी कोसळलेल्या दरडी मुळे वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. केळघर घाटातील यश ढाब्या नजीक (रेंगडी) ही दरड कोसळली आहे.
सातारा-महाबळेश्वर रस्त्यावर दरड कोसळली, सातार महाबळेश्वर रस्ता बंद
काही दिवसांपासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे या घाटात लहान दरडी कोसळत होत्या. मात्र, शनिवारी सकाळी कोसळलेल्या दरडीमुळे वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे. केळघर घाटातील यश ढाब्यानजीक (रेंगडी) ही दरड कोसळली आहे. या अपघातामुळे साताऱ्याला येणारी व महाबळेश्वरकडे जाणारी वाहने अडकली असून वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे.