कराड (सातारा) - पश्चिम महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी वरदान ठरलेल्या कराड येथील कृष्णा हॉस्पिटलने कोरोनामुक्तीचा तीन हजाराचा टप्पा पार केला आहे. सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर कृष्णा हॉस्पिटलने मार्च महिन्यात कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली. कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली कृष्णा हॉस्पिटलमध्ये विशेष वॉर्ड सुरू करण्यात आले. कृष्णा हॉस्पिटलने आता कोरोनामुक्तीचे तिसरे सहस्त्रक पूर्ण केले आहे.
कराडमधील कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनामुक्तीचे तिसरे सहस्त्रक पूर्ण
कराड येथील कृष्णा हॉस्पिटलने कोरोनामुक्तीचा तीन हजाराचा टप्पा पार केला आहे. सातारा जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढू लागल्यानंतर कृष्णा हॉस्पिटलने मार्च महिन्यात कोरोनाग्रस्त रूग्णांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभी केली होती.
या रुग्णालयात उपचार घेणाऱ्या दोन रूग्णांना नुकताच डिस्चार्ज देण्यात आला. त्यानुसार कृष्णा हॉस्पिटलमधील कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांचा आकडा 3 हजाराच्या पार गेला आहे. सुरूवातीला कृष्णा हॉस्पिटलमध्ये कोरोनाचे 500 हून अधिक रूग्ण असायचे. परंतु, कालांतराने परिस्थिती नियंत्रणात आली आहे. लोकांनी लशीची वाट पाहण्यापेक्षा आणि दुसर्या लाटेची भीती बाळगण्याऐवजी स्वत:च्या प्रकृतीकडे अधिक लक्ष द्यावे, असे आवाहनही या रुग्णालयाच्यावतीने करण्यात आले आहे.
हेही वाचा - श्रीलंकेतील तुरुंगात उसळेलल्या दंगलीत ११ जणांचा मृत्यू