सातारा : पुर्वेकडे सिंचनाची मागणी वाढल्यामुळे कोयना धरणाचा दुसरा वक्र दरवाजा आज (गुरूवारी) दुपारी एक फुटाने उघडण्यात आला ( Koyna Dam Second Gate Opened ) आहे. तत्पूर्वी एका दरवाजातून ११०० क्युसेक पाणी सोडण्यात आले होते. आता दोन्ही दरवाजांतून प्रति सेकंद २२०० क्युसेक पाणी कोयना नदीपत्रात सोडले जात आहे.
Koyna Dam : सिंचनाची मागणी वाढल्याने कोयना धरणाचा दुसरा दरवाजा उघडला - कोयना धरणाचा दुसरा दरवाजा उघडला
सातारा पूर्वेत सिंचनाची मागणी वाढली आहे. त्यामुळे कोयना धरणाचा दुसरा दरवाजा उघडण्यात ( Koyna Dam Second Gate Opened ) आला. कोयना धरणातून ११०० क्युसेक पाणी सोडले जात आहे.
सिंचनाची मागणी आणखी वाढली :ट्रान्समिशन लाईनच्या नियोजित कामामुळे कोयना धरणाचा पायथा वीजगृह शनिवारी (दि. १०) सकाळी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. त्यातच पुर्वेकडे सिंचनाची मागणी ( irrigation Demand increase in Satara East ) वाढली. त्यामुळे शनिवारी दुपारी कोयना धरणाचा एक वक्र दरवाजा १ फुटाने उघडून ११०० क्युसेक्स पाणी कोयना नदीपात्रात सोडण्यात आले ( 1100 Cusec Water Released ) आहे. मात्र, सिंचनाच्या मागणीत वाढ झाल्याने धरणाचा दुसरा दरवाजा आज दुपारी उघडण्यात आला आहे. कोयना धरणात सध्या ९४ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे.