कराड (सातारा) -कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरला आहे. तसेच धरणातील पाण्याची आवक देखील कमी होत आहे. त्यामुळे कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे आज (गुरुवारी) सकाळी 11 वाजता बंद करण्यात आले आहेत. सध्या पायथा वीजगृहाद्वारे 2100 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू आहे.
कोयना धरणाचे दरवाजे बंद, पावसाचा जोरही ओसरला - कोयना धरण पाणलोट क्षेत्र
कोयना धरणाची पाणी पातळी 2161 फूट 11 इंच तर पाणीसाठा 103.19 टीएमसी झाला आहे. धरण पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमान कमी झाल्यामुळे धरणामध्ये पाण्याची आवक कमी होत आहे. त्यामुळे आज (गुरुवारी) सकाळी 11 वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे बंद करण्यात आले आहेत. मात्र, पायथा विद्युत गृहाद्वारे एकूण 2100 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू राहणार आहे.
![कोयना धरणाचे दरवाजे बंद, पावसाचा जोरही ओसरला कोयना](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-13085080-107-13085080-1631805072954.jpg)
कोयना
कोयना धरणाचे दरवाजे बंद
कोयना धरणाची पाणी पातळी 2161 फूट 11 इंच तर पाणीसाठा 103.19 टीएमसी झाला आहे. धरण पाणलोट क्षेत्रातील पर्जन्यमान कमी झाल्यामुळे धरणामध्ये पाण्याची आवक कमी होत आहे. त्यामुळे आज (गुरुवारी) सकाळी 11 वाजता कोयना धरणाचे सहा वक्र दरवाजे बंद करण्यात आले आहेत. मात्र, पायथा विद्युत गृहाद्वारे एकूण 2100 क्युसेक विसर्ग नदीपात्रात सुरू राहणार आहे. धरणात पाण्याची आवक वाढल्यास पायथा विद्युतगृहाद्वारे सोडल्या जाणार्या विसर्गात वाढ करण्यात येईल, अशी माहिती धरण व्यवस्थापनाने दिली आहे.
Last Updated : Sep 16, 2021, 8:51 PM IST