साताराKoyna Dam Earthquake : कोयना धरण परिसरात शनिवारी रात्री 9 वाजून 5 मिनिटांनी भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला. या भूकंपाची तीव्रता 2.9 रिश्टर स्केल इतकी नोंदली गेली आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनानगरपासून 10 किलोमीटर अंतरावरील गोषटवाडी गावाच्या पश्चिमेस 7 किलोमीटरवर होता.
कोयना धरण सुरक्षित :भूकंपाच्या या धक्क्यामुळं कोयना धरणाला कोणताही धोका पोहोचलेला नाही. तसंच कोठंही पडझड झाली नसल्याची माहिती कोयना धरण व्यवस्थापन, महसूल प्रशासनाने दिली आहे. भूकंपाचा धक्का सौम्य असल्यानं तो कोयनानगर परिसरातच जाणवला. पाटण तालुक्यात अन्यत्र कोठंही या भूकंपानं पडझड झालेली नाही.
12 दिवसात भूकंपाचा दुसरा धक्का :कोयना धरण परिसरात दि. 16 ऑक्टोबर रोजी रात्री 11:30 च्या सुमारास 3.2 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला होता. भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून 24 किलोमीटर अंतरावर वारणा खोऱ्यातील चांदोली (जि. सांगली) गावाच्या पुर्वेस 7 किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाची खोली जमिनीत 17 किलोमीटर होती.