महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवला, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कोयना धरणांतर्गत क्षेत्रात पावसाचा जोर कमी असला तरी अंतर्गत विभागातून येणार्‍या पाण्याची आवक वाढली आहे. संपुष्टात आलेली पाणी साठवण क्षमता, तसेच पुर्वेकडे कोयना नदी पात्रात पाणी सामावून घेण्याची क्षमता लक्षात घेता विसर्ग वाढवण्यात आला आहे.

कोयना धरण

By

Published : Sep 5, 2019, 2:54 AM IST

सातारा - कोयना धरण पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या पर्जन्यवृष्टीमुळे कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे. धरणाचे सहा वक्री दरवाजे ६ फुटांवरून १० फुटांपर्यंत उघडण्यात आले आहेत. त्यामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे.

हेही वाचा - कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

कोयना धरणांतर्गत विभागात पावसाचा जोर कमी आहे. असे असले तरी अंतर्गत विभागातून येणार्‍या पाण्याची आवक वाढली आहे. संपुष्टात आलेली पाणी साठवण क्षमता, तसेच पुर्वेकडे कोयना नदी पात्रात पाणी सामावून घेण्याची क्षमता लक्षात घेता विसर्ग वाढवण्यात आला आहे.

हेही वाचा - तळकोकणात मुसळधार पाऊस; माणगाव-आंबेरी पूल पाण्याखाली, २७ गावांचा संपर्क तुटला

यामुळे नदीकाठची गावे, वाड्या, वस्त्यांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सद्यस्थितीत नदी पात्रात प्रवेश न करण्याचे आवाहनही सांगली पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता नामदेव करे यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details