महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोयना धरणाचे पायथा वीजगृह कार्यान्वित, पुर्वेकडील सिंचनासाठी पाणी सोडले - Koyna Dam base power house started

कोयना धरणाचे पायथा वीजगृह रविवारी सायंकाळी कार्यान्वित करून पुर्वेकडील सिंचनासाठी कोयना धरणातून 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कोयना धरणात सध्या 52.29 टीएमसी एवढा पाणीसाठा आहे.

koyana
कोयना

By

Published : Aug 3, 2020, 5:33 AM IST

सातारा - कोयना धरणाचे पायथा वीजगृह रविवारी सायंकाळी कार्यान्वित करून पुर्वेकडील सिंचनासाठी कोयना धरणातून 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. कोयना धरणात सध्या 52.29 टीएमसी एवढा पाणीसाठा आहे.

कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात कूर्मगतीने वाढ होत आहे. सध्या कोयना धरण निम्मे भरले आहे. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर कमी आहे. त्यामुळे कोयना धरणाचा पायथा वीजगृह बंद होता. पावसाने दडी मारल्यामुळे खरीप हंगामातील पिकांसाठी सध्या पाण्याची गरज आहे. पुर्वेकडील सिंचनासाठी कोयना धरणातून कोयना नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी होऊ लागल्याने कोयना धरणाचे पायथा वीजगृह कार्यान्वित करून रविवारी सायंकाळी कोयना धरणातून 1050 क्युसेक्स पाणी सोडण्यात आले आहे.

हेही वाचा -राम मंदिर उभारणीसाठी शिवसेनेकडून एक कोटींचा निधी, अनिल देसाईंची माहिती

कोयना धरणात 3 हजार 430 क्युसेक पाण्याची आवक होत असून धरणातील पाणीसाठा 52.29 टीएमसी झाला आहे. गेल्या चोवीस तासात धरण पाणलोट क्षेत्रातील कोयनानगर येथे 4, नवजा येथे 1, महाबळेश्वर येथे 2 आणि वाळवण येथे 3 मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यापासून कोयना धरण पाणलोट क्षेत्रातील वाळवण या ठिकाणी सर्वाधिक 2 हजार 592 मि. मी. पाऊस झाला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details