महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mild Earthquake In Koyna Dam : कोयना धरण परिसर भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला; सुदैवाने कोणतीही हानी नाही - No damage in earthquake

दुपारी १ वाजण्याच्या सुमारास कोयना धरण परिसरात भूकंपाचे सौम्य धक्के ( Mild earthquake shakes in Koyna Dam ) जाणवले. त्यामुळे परिसरातील नागरिक घाबरले आहेत. कोयना खोऱ्यातील हेळवाक गावाच्या नैऋत्येला ७ किलोमीटर अंतरावर भूकंप झाला होता. भूकंपाची खोली जमिनीत ९ किलोमीटर इतकी होती. भूकंपाच्या केंद्रबिंदूचे ( Earthquake Center ) अंतर कोयना धरणापासून १२ किलोमीटरवर होते.

mild earthquake
भूकंपाचे सौम्य धक्के

By

Published : Jul 22, 2022, 3:50 PM IST

Updated : Jul 22, 2022, 5:16 PM IST

सातारा -कोयना धरण परिसर दुपारी १ वाजण्याच्या सुमारास भूकंपाच्या सौम्य धक्क्यांनी हादरला ( Mild earthquake shakes in Koyna Dam ) आहे. कोयनानगरसह पाटण तालुक्यात हा धक्का जाणवला आहे. सुदैवाने भूकंपामुळे कुठेही पडझड झाल्याचे वृत्त नाही आहे. मात्र सतत भुकंपाचे धक्के जाणवू लागल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण ( fear situation in citizens) आहे.

भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना खोऱ्यात -कोयना धरण परिसरात दुपारी १ वाजण्याच्या सुमारास भूकंपाचा सौम्य धक्का ( Earthquake at Koyna Dam ) जाणवला. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना खोऱ्यातील हेळवाक गावाच्या नैऋत्येला ७ किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाची खोली जमिनीत ९ किलोमीटर इतकी होती. भूकंपाच्या केंद्रबिंदूचे ( Earthquake Center ) अंतर कोयना धरणापासून १२ किलोमीटरवर होते.

सौम्य धक्क्यामुळे पडझड नाही -कोयना परिसरातील आजच्या सौम्य भूकंपामुळे कोयनानगर अथवा परिसरात कोठेही पडझड झाल्याचे वृत्त नाही ( No damage in earthquake ). दि. ८ जानेवारी रोजी यंदाच्या वर्षातील पहिला भूकंप झाला होता. २.९ रिश्टर स्केल तीव्रतेच्या सौम्य भूकंपाचा धक्का कोयना धरण परिसरात जाणवला होता. त्यानंतर दि. १ फेब्रुवारीला 3.3 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंपाचा सौम्य धक्का जाणवला होता.

8 जानेवारीला भूकंपाचा सौम्य धक्का -कोयना धरण परिसरात शनिवारी दुपारी सव्वा दोनच्या सुमारास भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. भूकंप मापन केंद्रावर या धक्क्याची तीव्रता 2.9 रिश्टर स्केल एवढी नोंदली गेली आहे.या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयनानगरपासून 8 किलोमीटर अंतरावरील हेळवाक गावाच्या नैऋत्येस 6 किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाची खोली जमिनीखाली 4 किलोमीटर इतकी होती. कोयनानगर वगळता अन्यत्र भूकंपाचा हा धक्का जाणवला नाही.

हेही वाचा -First Transgender Corporator In Kolhapur: राज्यात प्रथमच! हुपरी नगरपरिषदेत तृतीयपंथी स्वीकृत नगरसेवक

Last Updated : Jul 22, 2022, 5:16 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details