महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Earthquake Koyna and Chiplun : कोयनानगर, चिपळूण परिसर भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला, भूकंपाची तीव्रता ३.१ रिश्टर स्केल

कोयना आणि चिपळूण परिसर आज सकाळी भूकंपाच्या सौम्य धक्क्याने (Koyna and Chiplun areas were shaken mild earthquake) हादरला. भूकंप मापन केंद्रावर या भूकंपाची (earthquake) तीव्रता ३.१ रिश्टर स्केल एवढी (earthquake recorded 3.1) नोंदली गेली आहे.

Earthquake Koyna and Chiplun
भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला

By

Published : Nov 15, 2022, 1:14 PM IST

सातारा :कोयना आणि चिपळूण परिसर आज सकाळी (15 नोव्हेंबर 2022) भूकंपाच्या सौम्य धक्क्याने (Koyna and Chiplun areas were shaken mild earthquake) हादरला. भूकंप मापन केंद्रावर या भूकंपाची तीव्रता ३.१ रिश्टर स्केल एवढी (earthquake recorded 3.1) नोंदली गेली आहे. या भूकंपाचा (earthquake) केंद्रबिंदू कोयना धरणापासून २८ किलोमीटर अंतरावर, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरच्या आग्नेयेस १३ किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाची खोली जमिनीत १६ किलोमीटर होती. भूकंपाच्या सौम्य धक्क्यामुळे कोठेही पडझड अथवा वित्तहानी झाल्याचे (No earthquake damage) वृत्त नाही.

कोयनानगर, चिपळूण परिसर भूकंपाच्या सौम्य धक्क्याने हादरला

याआधी 28 ऑक्टोंबरला बसला झटका : सातारा जिल्ह्यातील कोयणा धरणाजवळ भूकंपाचा सौम्य धक्का बसला आहे. भूकंपाचा केंद्रबिंदू हेळवाक गावाच्या नैऋत्येस ५ कि.मी. होता. भूकंपाची तीव्रता २.८ रिश्टर स्केल होती. भूकंपाने कोणतीही जीवित हानी अथवा वित्तहानी झालेली नाही. भूकंपाचा केंद्रबिंदू हेळवाक गावाच्या नैऋत्येस ५ कि.मी. होता. भूकंपाची तीव्रता २.८ रिश्टर स्केल होती. भूकंपाने कोणतीही जीवित हानी अथवा वित्तहानी झालेली नाही.

मागील वर्षात 129 धक्क्यांची नोंद -कोयना धरण परिसरात २०२१ सालात सौम्य आणि अति सौम्य भूकंपाची मालिकाच सुरू होती. भूकंप मापन केंद्रावर मागील वर्षभरात तब्बल 129 भूकंपाच्या धक्क्यांची नोंद झाली. त्यामध्ये ३ रिश्टर स्केलच्या 120 आणि ३ ते ४ रिश्टर स्केल तीव्रतेच्या ९ धक्क्यांचा समावेश होता. मागील महिन्यातदेखील असाच प्रकारचा तीव्रता २.८ रिश्टर स्केल असणारा धक्का जाणवला होता. आज झालेल्या भूकंपाचाकेंद्रबिंदू कोयना धरणापासून २८ किलोमीटर अंतरावर होता. या अचानक बसलेल्या या भूकंपाच्या धक्क्याने कोयना परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भूकंपाचा केंद्रबिंदू कोयना धरणापासून २८ किलोमीटर अंतरावर, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वरच्या आग्नेयेस १३ किलोमीटर अंतरावर होता. भूकंपाची खोली जमिनीत १६ किलोमीटर होती. भूकंपाच्या सौम्य धक्क्यामुळे कोठेही पडझड अथवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही.

वारंवार होणाऱ्या भूकंपामागील कारण : द्वीपकल्पीय भारतातील कोयना-वारणा प्रदेशातील भूकंप हे जलाशय ट्रिगर मानले जातात. अनेक ठिकाणी उदा. प्रचंड प्रमाणात पाणी साठा केलेल्या धरणात भूपृष्ठावर प्रमाणाबाहेर ताण पडून भूकंप होतात. कोयना धरणामुळे असे भूकंप वारंवार होत आहेत. कांही वेळा भूपृष्ठाच्या विविध विभागलेल्या कडा परस्परांना टकरावतात व त्यातून प्रलयंकारी भूकंप,त्सुनामी असे परिणाम भोगावे लागतात.

ABOUT THE AUTHOR

...view details