सातारा- राज्याची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणाचे शनिवारी सकाळी 8.00 वाजता एकूण 71.55 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. मात्र, सध्यस्थितीत धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात येणार नसल्याचे पाटबंधारे विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
सध्या कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग नाही, ..तरच सोडले जाईल पाणी
कोयना धरणामध्ये एकूण 73.18 टीएमसी पाणीसाठा होईल तेव्हा पाणी पातळी 6 वक्रद्वारा पर्यंत पोहोचेल. म्हणजे पाणीपातळी सांडवा माथ्यापर्यंत पोहोचेल. सध्याची पाण्याची आवक पाहता आज किंवा उद्या पाण्याची पातळी ही 73.18 टीएमसी वर पोहोचण्याची शक्यता आहे.
कोयना धरणामध्ये एकूण 73.18 टीएमसी पाणीसाठा होईल तेव्हा पाणी पातळी 6 वक्रद्वारा पर्यंत पोहोचेल. म्हणजे पाणीपातळी सांडवा माथ्यापर्यंत पोहोचेल. सध्याची पाण्याची आवक पाहता आज किंवा उद्या पाण्याची पातळी ही 73.18 टिएमसी वर पोहोचण्याची शक्यता आहे. त्यानंतर पाणी सोडण्याबाबत प्रशासन निर्णय घेऊ शकते. सध्या कोणत्याही प्रकारे धरणातून विसर्ग सोडण्याचे नियोजन नाही.
धरण परिचालन सूची (ROS) नुसारच पाण्याचा साठा व आवक विचारात घेऊन धरणातून विसर्ग सोडण्याचा निर्णय घेतला जाईल. विसर्ग सोडण्यापर्वी सर्वाना पूर्व कल्पना देऊनच सोडला जातो. सध्या कोयना धरणात मागील काही दिवसांच्या तुलनेत पाण्याची आवक कमी आहे. तरी कृपया कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये. अशी माहिती कोयना सिंचन विभागाचे माहिती कार्यकारी अभियंता कुमार पाटील यांनी दिली.