सातारा- गणपती यात्रेत धक्का लागल्याच्या कारणावरून एकावर चाकू हल्ला करण्यात आला आहे. त्यात 19 वर्षाचा युवक गंभीर जखमी झाला आहे. मंगळवारी रात्री कराड तालुक्यातील शेरे गावात ही घटना घडली. सौरभ राजेंद्र देशमुख (वय 19), असे जखमी युवकाचे नाव आहे.
कराडमध्ये गणपती यात्रेत धक्का लागल्याच्या कारणावरून युवकावर चाकूने वार - satara karad
सौरभ राजेंद्र देशमुख (वय 19), असे जखमी युवकाचे नाव आहे.
![कराडमध्ये गणपती यात्रेत धक्का लागल्याच्या कारणावरून युवकावर चाकूने वार knife attack](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-5890087-thumbnail-3x2-d.jpg)
हेही वाचा -नागरिकत्व कायदा लागू करणार नसल्याचे गृहमंत्र्यांचे संकेत
जखमी सौरभ देशमुख याने कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून, रामा सुभाष हिपूरकर याच्यावर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. सौरभ देशमुख हा त्याचा मित्र विश्वनाथ पाटसुपे याच्यासोबत मंगळवारी रात्री शेरे स्टेशन येथील गणपती यात्रेत गेला होत. यात्रेच्या गर्दीत त्याचा रामा हिपूरकर याला धक्का लागला. त्यावरून देशमुख आणि हिपूरकर यांच्यात भांडण झाले. त्यानंतर रात्री दहाच्या सुमारास सौरभ हा मित्रासोबत बोलत उभा असताना रामा हिपूरकर याने चाकूने सौरभच्या पोटावर, चेहर्यावर वार केले. त्यामध्ये सौरभ गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संशयित रामा हिपूरकर याच्यावर कराड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.