महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

'किसन वीर'चा निकाल; मदन भोसलेंना धक्का, मकरंद पाटलांनी उधळला विजयाचा गुलाल - किसनवीर सहकारी साखर मराठी बातमी

किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत ( Kisan Vir Sugar Factory Election ) आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या शेतकरी बचाव पॅनेलचा विजय झाला ( Makarant Patil Panel Win 21 Seats ) आहे.

kisan vir sugar factory election
kisan vir sugar factory election

By

Published : May 5, 2022, 10:35 PM IST

सातारा - किसनवीर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष नितीन पाटील यांच्या शेतकरी बचाव पॅनेलचा विजय झाला ( Kisan Vir Sugar Factory Election ) आहे. गेली एकोणीस वर्षे कारखान्यावर सत्ता गाजविणाऱ्या माजी आमदार मदन भोसले यांच्या वर्चस्वाला धक्का दिला आहे. शेतकरी बचाव पॅनेलने सर्व २१ जागांवर निर्विवाद वर्चस्व ( Makarant Patil Panel Win 21 Seats ) मिळविले.

भुईंजच्या किसन वीर साखर कारखान्यासाठी ३ मे रोजी ६९.३१ टक्के मतदान झाले होते. ५ मे रोजी श्रीनिवास मंगल कार्यालयात मतमोजणी झाली. पहिल्या फेरीपासून ऊस उत्पादक गटातून व राखीव गट आणि सोसायटी मतदार संघात मकरंद पाटीलांच्या पॅनेलने आघाडी घेतली होती. कवठे-खंडाळा व भुईंज या सोसायटी गटात आमदार मकरंद पाटील यांच्या किसन वीर बचाव शेतकरी पॅनेलच्या उमेदवारांनी आघाडी घेतल्याचे पाहायला मिळाले. कारखान्याचे चेअरमन, माजी आमदार मदन भोसले यांचे शेतकरी विकास पॅनेल पिछाडीवर असल्याचे चित्र स्पष्ट होत गेले. कवठे-खंडाळा गटात नितीन पाटील २२२४४ मते घेऊन आघाडी घेतली तर भुईंज गटात माजी आमदार मदन भोसले हे १२९७० मतांसहित पिछाडीवर राहिले.

दोन दशकाच्या कालावधीनंतर आमदार मकरंद पाटील गटाने किसनवीर कारखान्याच्या निवडणुकीत उडी घेतली. यंदाच्या कारखान्याच्या निवडणुकीकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. या निवडणुकीत आमदार मकरंद पाटील यांच्या नेतृत्वाखालील किसन वीर बचाव शेतकरी परिवर्तन पॅनेलने सर्व २१ जागा जिंकत घवघवीत यश मिळवले. पहिल्या फेरीतील मतमोजणीचे निकालामध्ये आमदार मकरंद पाटील यांच्या किसन वीर बचाव शेतकरी पॅनेलने कवठे-खंडाळा गटात व भुईंज, वाईस, बावधन, जावली, सातारा, कोरेगाव ऊस उत्पादक गटात आघाडी घेतली.

विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते -

  • आमदार मकरंद पाटील सोसायटी मतदारसंघ (२३८)
  • अनुसूचित जाती जमाती -गट-संजय कांबळे (२२७२४)
  • भटक्या विमुक्त जाती जमाती-हणमंत चवरे ( २२६६६१)
  • महिला राखीव-वीर सरला (२१५६१) व जाधव सुशीला (२२३९४)
  • इतर मागास वर्ग-शिवाजी जमदाडे (२२६१०),
  • ऊस उत्पादक गट-कवठे खंडाळा-नितीन जाधव पाटील (२२२४४), रामदास गाढवे(२२१५५), किरण काळोखे (२१७१६),
  • भुईंज -प्रमोद शिंदे (२१५०७), प्रकाश धरगुडे (२१६७९), रामदास इथापे (२१५६८)
  • वाई बावधन जावली- दिलीप पिसाळ (२२३५९), शशिकांत पिसाळ (२२०५८), हिंदुराव तरडे (२१४६९)
  • सातारा -संदीप चव्हाण (२२११०), सचिन जाधव (२३०३६), बाबासाहेब कदम (२१८३३)
  • कोरेगाव -ललित मुळीक (२१७६७), संजय फाळके (२१७७३), सचिन साळुंखे (२१५३२)

हेही वाचा -Ramdas Athwale : 'भीमा-कोरेगाव प्रकरणी संभाजी भिडेवर कारवाईसाठी राज्य सरकारसोबत पत्रव्यवहार करणार'

ABOUT THE AUTHOR

...view details