सातारा - स्वतःच्याइन्शुरन्सची दीड कोटींची रक्कम मिळवण्यासाठी एकाने आपल्या मित्राची हत्या करत, त्याला स्वतःच्या गाडीसह जाळल्याची घटना साताऱ्यात घडली आहे. स्वतःच्या खूनाचा बनाव करणाऱ्या या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. सुमित सुरेश मोरे (रा. महिमानगड, ता. माण) असे या अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
हेही वाचा... VIDEO: क्रिकेटच्या मैदानात रक्ताचा सडा, तलवारीने सपासप वार
वाठार पोलिसांना सातारा जिल्ह्यातील बोधेवाडी घाटात कार आणि मृतदेह जळालेल्या अवस्थेत सापडला होता. या घटनेत सुमित मोरे नावाच्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचे प्राथमिक पोलीस तपासात समोर आले होते. मात्र अधिक तपासाअंती सुमित मोरे या तरूणानेच हा बनाव रचून आपला मित्र सुनिल आवळेची हत्या केल्याचे समोर आले आहे.
हेही वाचा... मुंबईत पुन्हा सेक्स रॅकेटचा पर्दाफाश, हिंदी वेब सिरीजमधील अभिनेत्रीसह ४ मॉडेलची सुटका
नेमके प्रकरण काय ?
साताऱ्याच्या माण तालुक्यातील महिमानगड येथील मूळचा सुमित मोरे हा आई वडिल आणि कुटुंबियांसोबत मुंबईतील सायन भागातील काळा किल्ला परिसरात राहत होता. तो करत असलेल्या व्यवसायात त्याच्या अंगावर सुमारे 50 लाखाचे कर्ज झाले होते. त्यामुळे त्याने मुंबईत आयसीआयसीआय कंपनीचा दीड कोटी रुपयांचा विमा उतरवला. ‘आपण मेलो तर दिड कोटी रुपये मिळणार, मग जर माझ्या मृत्यूचा खोटा दाखलाच तयार केला तर.. याच उद्देशाना त्याने एक प्लॅन बनवला.
त्यानुसार 20 जानेवारीला सुमित मुंबईतून साताऱ्यात आला. त्याने माण तालुक्यातील उकिर्डे गावातील मित्र सुनिल आवळेला बोलावून घेतले. आपल्याला एका महत्वाच्या कामासाठी जायचे असल्याचे असे म्हणत त्याने स्वत:च्या गाडीतून त्याला घेऊन गेला. त्यावेळी तुझे कपडे खराब आहेत, असे म्हणत त्याने सुनिलला त्याने स्वत:चे कपडे घालायला दिले. त्यानंतर बहाणा तयार करुन त्याला निर्जन स्थळी नेत गाडीतून खाली उतरवले.
त्यानंतर सुमितने सुनिलच्या डोक्यात स्टंप मारुन त्याने त्याला बेशुध्द केले. सुमितने बेशुध्द सुनिलला सुमारे चार तास गाडीतून फिरवत अखेर बुधघाटात आणले. त्यानंतर त्याला स्टेरींगवर बसवत गाडीवर पेट्रोल ओतून पेटवून दिले. पेटत असलेला सुनिल शुध्दीवर आला आणि स्टेअरिंगवरुन खाली उतरला, हे पाहून सुमितने त्याच्या अंगावर आणखी पेट्रोल ओतले. यातच त्याचा मृत्यू झाला.
यानंतर वाठार पोलिसांनी नातेवाईकांना बोलावून तुमच्या मलाचा मृत्यू झाल्यचे सांगून सुमितचा मृतदेह त्यांच्या ताब्यात दिला. सर्वकाही मनासारखे झाले होते, परंतू पोलिसांच्या डोक्यात कुठेतरी शंका होती. त्यानंतर पोलिसांनी अधिक चौकशी केली असता हा बनाव असल्याचे उघड झाले. त्यानंतर पोलिसांनी शोध घेत जेजूरी येथून सुमितला अटक केली. चौकशीनंतर त्याने दिलेल्या माहितीनुसार या गुन्ह्यात सहभागी असलेले त्याचे वडिल, दोन भाऊ आणि एक मित्र अशा सर्वांनाच बेड्या ठोकल्या आहेत.