सातारा : सातारा जिल्ह्यातील खटावचे ( Khatav in Satara district ) सुपुत्र वीर जवान सूरज शेळके ( Veer Jawan Suraj Shelke ) यांच्या पार्थिवावर शनिवारी रात्री खटाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार ( Funeral in Goverment Rules ) करण्यात आले. खटावकरांनी त्यांना साश्रुपूर्ण नयनांनी अखेरचा निरोप ( Last Farewell with Tearful Eyes ) दिला. पोलीस आणि सैन्य दलाच्या तुकडीने हवेत बंदुकींच्या फैरी झाडून तसेच अंतिम बिगुल वाजवून मानवंदना दिली. यावेळी हजारो अबालवृद्धांच्या अश्रूंचा बांध फुटला. ( Tears Welled Up )
पुण्यात लष्कराकडून मानवंदना : वीर जवान सूरज शेळके यांचे पार्थिव विमानाने शनिवारी रात्री पुण्यात आणण्यात आले. त्या ठिकाणी लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्यांनी पार्थिवाला मानवंदना दिली. त्यानंतर पार्थिव खटावला आणण्यात आले. यावेळी हजारो खटावकरांनी वीर जवानाला अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित होते. सजवलेल्या वाहनातून वीर जवान सूरज शेळके यांच्या पार्थिवाची अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विजयकुमार पाटील यांच्यासह शासकीय अधिकार्यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून मानवंदना दिली.